महिला आयपीएसच्या घरावर छापा, करोडोंची मालमत्ता आली समोर

पश्चिम मेदिनीपूरमध्ये जिल्ह्यातील माजी पोलीस अधीक्षक आणि आयपीएस अधिकारी भारती घोष यांच्या ठिकाणावर छापेमारी करण्यात आली आहे.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Feb 7, 2018, 11:24 AM IST
महिला आयपीएसच्या घरावर छापा, करोडोंची मालमत्ता आली समोर title=

कोलकाता : पश्चिम मेदिनीपूरमध्ये जिल्ह्यातील माजी पोलीस अधीक्षक आणि आयपीएस अधिकारी भारती घोष यांच्या ठिकाणावर छापेमारी करण्यात आली आहे.

पदाचा दिलेला राजीनामा

क्राईम ब्रँचने मारलेल्या 3 छाप्यांमध्ये जवळपास 2.5 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. बदली नंतर नाराज होऊन राजीनामा दिलेल्या पश्चिम मेदिनीपूरच्या माजी एसपी आयपीएस भारती घोष यांच्या कोलकात्यातील घरी हा छापा मारण्यात आला. इतक्या मोठ्या प्रमाणात रक्कम सापडल्याने त्यांच्या अडचणी आता वाढणार आहेत.

2 दिवसातच कारवाई

एसपी पदावरुन हटवल्यानंतर भारती घोष यांनी राजीनामा दिला होता. यानंतर 2 दिवसातच त्यांच्या घरावर आणि जवळच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या ठिकाणांवर देखील छापेमारी करण्यात आली. यामध्यो कोटींची संपत्ती समोर आली आहे.