क्लिअर ट्रिपची खास दिवाळी ऑफर

हॉटेल बुकिंग, फ्लाईट्स बुकिंग यांची एका क्लिकवर सोय करण्यासाठी क्लिअर ट्रिप प्रवाशांना मदत करते.

Updated: Oct 14, 2017, 08:33 PM IST
क्लिअर ट्रिपची खास दिवाळी ऑफर  title=

मुंबई : हॉटेल बुकिंग, फ्लाईट्स बुकिंग यांची एका क्लिकवर सोय करण्यासाठी क्लिअर ट्रिप प्रवाशांना मदत करते.

दिवाळीच्या सुट्ट्यांचा काळ सुरू होतेय यादरम्यान प्रवाशांची वाढती संख्या पाहता क्लिअर ट्रिपने खास ऑफर आणली आहे. 

क्लिअर ट्रिपच्या ऑफरनुसार तुम्हांला कॅन्सलेशन फी देण्याची गरज नाही तसेच बुकिंगच्या वेळेस ३० % कॅश बॅक देण्याची सोयही आहे. क्लिअर ट्रिपची ही ऑफर १८ ऑक्टोबरला सकाळी १० वाजल्यापासून वेबसाईट आणि मोबाईल अ‍ॅपवर खुली करण्यात येणार आहे. 

भारतातून परदेशात एखादी ट्रीप प्लॅन करणार्‍यांसाठी सुमारे २५००० रूपयांचा कॅशबॅक मिळू शकतो. दिवळीच्या दिवसात हॉटेलबुकिंग किंवा विमानाचे तिकीट काढताना हमखास अनेकदा प्लॅन बिघडतात. त्यामुळे अशावेळेस रद्द झालेल्या प्लॅनची कॅन्सलेशन फी देण्याची गरज नाही. 

तुम्ही देखील यंदा सुट्ट्यांमध्ये ट्रिप प्लॅन करत करत असाल तर या सुविधेचा उपभोग घेण्यासाठी 'दिवाली' असा कुपन कोड वापरावा लागणार आहे.