अमरावती : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी यांनी 'प्रजा वेदिका' मारत तोडण्याचे आदेश दिले आहे. मंगळवारी इमारत तोडण्याचं काम सुरु होणार आहे. 'प्रजा वेदिका' येथे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू राहतात. काही दिवसांपूर्वी चंद्रबाबू नायडू यांनी जगनमोहन रेड्डी यांना पत्र लिहून 'प्रजा वेदिका' याला विरोधी पक्षाचं निवासस्थान म्हणून घोषित करण्याची मागणी केली होती.
वायएसआर काँग्रेस पक्षाच्या सरकारने शनिवारी चंद्राबाबू नायडू यांच्या अमरावती येथील प्रजा वेदिका इमारतीला ताब्यात घेतलं. तेलुगू देशम पक्षाने ही कारवाई म्हणजे बदल्य़ाची भावना असल्याचं म्हटलं आहे. विरोधी पक्षाने आरोप केला आहे की, 'सरकारने माजी मुख्यमंत्र्यांच्या प्रति कोणतीच सद्भावना दाखवली नाही. त्यांचं सामना अमरावतीच्या उंदावल्ली घरातून बाहेर फेकण्यात आलं.' त्यामुळे आता पुढे काय कारवाई होते हे पाहावं लागेल.
जेव्हा आंध्र प्रदेशने आपलं कामकाज हैदराबाद येथून अमरावतीला हलवलं. तेव्हापासून चंद्राबाबू नायडू कृष्णा नदीच्या किनारी असलेल्या उंदावल्ली येथील निवासस्थानी राहत होते. हैदाबाद आता तेलंगणाची राजधानी आहे. प्रजा वेदिकाचं निर्माण सरकारने आंध्र प्रदेशच्या राजधानी क्षेत्र विकास प्राधिकरणच्या माध्यमातून तत्कालीन मुख्यमंत्री निवासस्थानाच्या रुपात केलं होतं. 5 कोटी खर्च करुन हे निवासस्थान बनवण्यात आलं होतं. या निवासस्थानाचा वापर नायडू हे सरकारी तसेच पक्षाच्या बैठकांसाठी देखील करत होते.
Andhra Pradesh CM YS Jagan Mohan Reddy orders demolition of 'Praja Vedika' building, demolition of the building to begin day after tomorrow. (file pic) pic.twitter.com/B5ITbRNKQ8
— ANI (@ANI) June 24, 2019
नायडू यांना पत्र लिहून मुख्यमंत्री वाय.एस. जगनमोहन रेड्डी यांना पत्र लिहून या इमारतीचा वापर बैठकांसाठी करण्य़ाची परवानगी मागितली. पण सरकारने ही इमारत ताब्यात घेतली. कलेक्टक संमेलन येथे होणार असल्य़ाची घोषणा सरकारने शुक्रवारी केली. आधी हे संमेलन राज्याच्या सचिवालयात होत होतं. नायडू सध्या आपल्या कुटुंबियांसोबत परदेशात आहेत.
टीडीपी नेता आणि विधान परिषदेचे सदस्य अशोक बाबू यांनी म्हटलं की, 'सरकारी कर्मचाऱ्यांनी नायडू यांचं सामान बाहेर फेकलं. ही इमारत ताब्यात घेण्यापूर्वी काही कल्पना देखील दिली नाही.' तर मंत्री सत्यनारायण यांनी म्हटलं की, नायडू यांच्यासोबत तसाच व्यवहार केला जाईल जसा व्यवहार जगन मोहन रेड्डी विरोधी पक्षाचे नेते असताना केला जात होता.