नवी दिल्ली : तुम्ही सीएनजी कार किंवा रिक्षा चालवता? तर मग ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण, सीएनजीच्या दरात कपात करण्यात आली आहे.
सीएनजीच्या दरातमध्ये ३.१५ रुपये प्रति किलोग्रॅम कपात करण्यात आली आहे. सीएनजीच्या दरातील ही कपात उत्तर प्रदेशात लागू झाल्या आहेत.
उत्तर प्रदेश सरकारतर्फे सीएनजीवर लावण्यात आलेल्या वॅटमध्ये कपात करण्यात आल्याने किंमतीत कपात झाली आहे. आता या कपातीमुळे सीएनजीचे दर ४९.२० रुपये प्रति किलोग्रॅमवरुन ४६.०५ रुपये झाले आहेत.
सीएनजीचे नवे दर २२ आणि २३ मार्च मध्यरात्रीपासून लागू होणार आहेत. यासोबतच आयजीएलतर्फे आधीपासूनच देण्यात येणारी दिड रुपये प्रति किलोग्रॅम सूटची ऑफरही आहे.
या ऑफरनुसार आयजीएलच्या ठराविक आऊटलेटवर रात्री १२.३० ते पहाटे ५.३० वाजेपर्यंत सीएनजी भरणाऱ्या ग्राहकांना १.५० रुपयांची सूट देण्यात येत आहे. म्हणजेच तुम्ही रात्री १२.३० ते पहाटे ५.३० दरम्यान सीएनजी भरल्यास तुम्हाला प्रति किलोग्रॅम ४.५५ रुपयांचा फायदा होणार आहे.
म्हणजेच आता तुम्हाला ४४.५५ रुपये प्रति किलोग्रॅम या दराने पैसे मोजावे लागणार आहेत. नोएडा, ग्रेटर नोएडा आणि गाझियाबाद या ठिकाणच्या सीएनजी स्टेशनवर ही सुविधा उपलब्ध आहे.