मुलीसोबत बोलण्यास मनाई केली, दोन विद्यार्थ्यांनी शिक्षकावरच झाडली गोळी, नंतर व्हायरल केला VIDEO

Crime News In Marathi: दोन विद्यार्थ्यांनी कोचिंग सेंटरच्या शिक्षकांवर गोळ्या झाडल्याची घटना समोर आली आहे. यानंतर त्यांनी व्हिडिओ व्हायरल करत धमकीही दिली आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Oct 6, 2023, 02:47 PM IST
मुलीसोबत बोलण्यास मनाई केली, दोन विद्यार्थ्यांनी शिक्षकावरच झाडली गोळी, नंतर व्हायरल केला VIDEO  title=
coaching student shot teacher agra video goes viral news in marathi

Crime News In Marathi: दोन तरुणांनी आपल्याच शिक्षकांवर गोळ्या झाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इतकंच नव्हे तर, शिक्षकावर गोळ्या झाडल्यानंतर सोशल मीडियावर व्हिडिओदेखील व्हायरल करुन धमकी दिली आहे. त्याने म्हटलं आहे की, आत्ता एकच गोळी झाडली आहे अजून 39 गोळ्या बाकी आहेत, असं म्हणत खुलेआम जीवे मारण्याची धमकी दिली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच पोलिसांनी दोघांना अटक केली आहे तर दोघा आरोपींपैकी एक अल्पवयीन आहे. 

फिल्मी स्टाइल गोळ्या चालवून माजवली दहशत

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात दोन मुलं फिल्मी स्टाइलमध्ये आपल्या शिक्षकाला गोळी मारण्याचा वृतांत सांगत आहेत. त्यानंतर पुन्हा गोळी मारण्याची धमकी देण्यात आली. या व्हिडिओतील एका मुलांचे वय 16 ते 17 दरम्यान आहे. तर, एकाचे वय 18 वर्षे इतके आहे. या घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आरोपींनी गावठी कट्टा वापरुन शिक्षकाच्या पायावर गोळी झाडली आहे. त्यानंतर फिल्मी स्टाइलमध्ये व्हिडिओ बनवून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला आहे. पोलिसांनी दोघांनाही अटक केली असून त्यांच्याविरोधात कलम 307 विरोधात कारवाई करण्यात येत आहे. 

काय घडलं नेमकं?

आग्रायेथील खंदौलीतील मलूपुर गावातील आहे. गावात राहणाऱ्या सुमित सिंह हे डॉ. भीमराव आंबेडकर नावाने कोचिंग इन्स्टिट्युड चालवत होते. गुरुवारी दुपारी दोन मुलं दुचाकीवर बसून सुमित यांच्या कोचिंग सेंटवर येथे पोहोचले. त्यानंतर दोघांनी गावठी कट्टा वापरुन सुमितच्या पायावर गोळी झाडली. सुमित यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपींना अटक केली आहे. 

धडा शिकवण्यासाठी चालवल्या गोळ्या 

सुमित यांच्या कोचिंग सेंटरमध्ये शिकत असलेल्या एका मुलीसोबत दोघ फोनवर बोलत असे. ही गोष्ट सुमितला कळली त्यानंतर त्याने मुलीच्या वडिलांना याबाबत माहिती दिली. म्हणूनच दोन्ही मुलांनी शिक्षक सुमितला धडा शिकवण्यासाठी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. 

व्हायरल व्हिडिओत काय म्हटलंय?

आरोपींचा 25 सेकंदाचा एक व्हिडिओ व्हायरल होतो. या व्हिडिओत आरोपी मुलगा बोलत आहे. अजून 4-6 दिवस थांब 6 महिन्यांनंतर तुझ्या पायाची अक्षरश: चाळण करेन. तुझ्यावर 40 गोळ्या चालवायच्या आहेत. अजून 49 शिल्लक आहेत, अशी धमकी या आरोपींनी दिली आहे.