कोलकाता : येथील विधानसभा निवडणुकीच्या आधी राजकीय वातावरण तापल्याचे दिसून येत आहे. पश्चिम बंगालच्या (West Bengal) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी Mamata Banerjee) मंगळवारी आपल्या पुतण्या आणि तृणमूल कॉंग्रेसचे (TMC) नेते अभिषेक बॅनर्जी (Abhishek Banerjee) यांना भेटण्यासाठी आल्या. ममता बॅनर्जी यांनी अभिषेक बॅनर्जी यांनी त्यांच्या कोलकाता येथील निवासस्थानी भेट घेतली. त्याचवेळी सीबीआयची टीम अभिषेक बॅनर्जी यांच्या घरीही पोहोचली आहे. कोळसा घोटाळा प्रकरणात अभिषेक (Coal Scam Case: Abhishek Banerjee) यांची पत्नी रुजिरा बॅनर्जी (Rujira Banerjee) यांच्याकडे चौकशी करण्यासाठी सीबीआयची टीम पोहोचली आहे. त्यामुळे कोलकाता येथे राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021 च्या अगोदरच राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. भाजपने या निवडणुकीसाठी सीबीआयचा आसरा घेतल्याचा आरोप सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने केला आहे. त्यासाठीच चौकशीच्या नावाखाली पश्चिम बंगालमध्ये सीबीआयटी टीम पोहोचली आहे. हे दबावाचे राजकारण आहे, असा आरोप तृणमूलकडून करण्यात आला आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आज आपल्या भाच्याच्या अर्थात अभिषेक बॅनर्जी यांच्या घरी दाखल झाल्या. उल्लेखनीय म्हणजे, कोळसा घोटाळा प्रकरणात अभिषेक बॅनर्जी यांच्या पत्नीची आज सीबीआय चौकशी कणार आहे.
#WATCH | Kolkata: West Bengal CM Mamata Banerjee arrives at nephew and TMC leader Abhishek Banerjee's residence
Abhishek's wife, Rujira, is expected to answer CBI's queries today in connection with the coal scam case pic.twitter.com/srmLo7awiW
— ANI (@ANI) February 23, 2021
ममता बॅनर्जी या अभिषेक बॅनर्जी यांच्या मुलीसोबत त्यांच्या घरी दिसल्या. थोड्याच वेळानंतर सीबीआय अधिकारी अभिषेक यांच्या पत्नीची चौकशी करण्यासाठी पोहचलेले होते. सीबीआयकडून रविवारी सायंकाळी चौकशीत सहभागी होण्यासाठी तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांची पत्नी रुजिरा बॅनर्जी यांना समन्स पाठवले होते. त्यानंतर आज सीबीआयच्या टीमच्या हालचाली दिसून आल्या.
कथित कोळसा घोटाळा प्रकरणात चौकशीसाठी केंद्रीय समितीच्या अधिकारी मंगळवारी आपल्या घरी येऊ शकतात, असे त्यांनी आपल्या उत्तरात म्हटले होते. आज याच प्रकरणात त्यांची चौकशी होणार आहे. रुजिरा यांनी समन्सला उत्तर देताना सीबीआयला मंगळवारी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजण्याच्या दरम्यान आपल्या निवासस्थानी येण्याची विनंती केली होती. 'मला चौकशीसाठी का बोलावण्यात येत आहे किंवा चौकशीचा विषय काय आहे, त्यामागच्या कारणापासून मी अनभिज्ञ आहे, असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, केव्हाही माझ्या निवासस्थानी येऊ शकता, असे रुजिरा यांनी सीबीआयला उत्तर देताना म्हटले आहे.