नवी दिल्ली : GST लागू झाल्यानंतर पॅकबंद अन्नपदार्थांच्या पुड्यांवर नवे MRP छापणं कंपन्यांना बंधनकारक असेल, असं अन्नप्रक्रिया मंत्री रामविलास पासवान यांनी स्पष्ट केलंय. कंपन्यांना त्यासाठी सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आलीये. त्यानंतर GSTचा अंतर्भाव नसलेले दर छापलेले दिसल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिलाय.
GST कमी झाल्यामुळे होणारा फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचला पाहिजे, असं पासवान म्हणाले. दुसरीकडे GST लागू झाल्यानंतर जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतींवर सरकारचं लक्ष असल्याचं केंद्रीय महसूलसचिव हसमुख अढिया यांनी म्हटलंय. GSTमुळे वस्तूंच्या बाजारमध्ये कोणतीही मोठी उलथापालथ झाल्याची माहिती नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.