मेघालयमध्ये सरकार स्थापनेसाठी काँग्रेसचा दावा, भाजपकडूनही प्रयत्न सुरु

त्रिपुरा आणि नगालँडमध्ये पराभव झाल्यानंतर काँग्रेस मेघालयमध्ये सरकार स्थापनेसाठी प्रयत्न केला आहे. 

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Mar 4, 2018, 02:41 PM IST
मेघालयमध्ये सरकार स्थापनेसाठी काँग्रेसचा दावा, भाजपकडूनही प्रयत्न सुरु title=

नवी दिल्ली : त्रिपुरा आणि नगालँडमध्ये पराभव झाल्यानंतर काँग्रेस मेघालयमध्ये सरकार स्थापनेसाठी प्रयत्न केला आहे. 

काँग्रेसचे दिग्गज नेते तेथे उपस्थित आहेत. काँग्रेसने 21 जागांवर विजय मिळवला आहे. मेघालयमध्ये काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. पक्षाचे नेते अहमद पटेल आणि कमल नाथ सरकार बनवण्यासाठी अपक्ष उमेदवारांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करत आहेत.

नेत्यांनी स्थानिक नेतृत्व, दुसरे पक्ष आणि उमेदवारांसोबत चर्चा सुरु केली आहे. काँग्रेस नेत्यांनी रविवारी राज्यपाल गंगा प्रसाद यांची भेट घेतली. काँग्रेसला बहुमतासाठी 31 जागा मिळवायच्या आहेत.

दुसरीकडे भाजप देखील काँग्रेसची सरकार बनू नये म्हणून प्रयत्न करत आहे. खूपच अल्पमतात असलेल्या भाजपने मेघालयमध्ये सरकार बनवण्यासाठी कंबर कसली आहे. गोवा आणि मणिपूरमध्ये काँग्रेसकडे जास्त जागा असतांना देखील सरकार स्थापन करण्यात त्यांना अपयश आलं. अपक्ष उमेदवार सॅमुअल एस संगमा यांनी भाजप नेते हेमंत विस्वा सरमा यांची भेट घेऊन त्यांना समर्थन करत असल्याचं म्हटलं आहे.