काँग्रेस नेत्यांकडून मोदींचं तोंडभरून कौतुक

काँग्रेस नेत्यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारचं गुणगान सुरू केल्याचं पुढे आलं आहे.

Updated: Oct 22, 2019, 03:33 PM IST
काँग्रेस नेत्यांकडून मोदींचं तोंडभरून कौतुक

नवी दिल्ली : काँग्रेस नेत्यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारचं गुणगान सुरू केल्याचं पुढे आलं आहे. काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शिद यांनी मोदी सरकारच्या आयुषमान या आरोग्य योजनेचं कौतुक केल आहे. आयुषमान ही अत्यंत चांगली योजना आहे. या योजनेला सर्वांचं सहकार्य मिळायला हवं, असं त्यांनी बोलून दाखवलं आहे.

तर दुसरीकडे काँग्रेस प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी यांनीही ट्विटवर मोदी सरकारच्या सुरक्षेसंदर्भातल्या धोरणांचं कौतुक केलंय. सियाचिनमधील सुरक्षा व्यवस्थेत सुधारणा झाल्यामुळे पर्यटकांमध्ये कमालीची वाढ झाल्याचं त्यांनी ट्विटरवर नमूद केलंय.

याआधी काल अभिषेक मनु सिंघवी यांनी सावरकरांचं कौतुक करणारं ट्विट केलं होतं. 'मी वैयक्तिक सावकरांच्या विचारांचं समर्थन करत नाही, पण ते एक परिपूर्ण व्यक्तीमत्व होतं हे तथ्य मी नाकारत नाही. त्यांनी आपल्या स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला आहे. सावरकर दलितांच्या अधिकारासाठी लढले आणि देशासाठी जेलमध्येही गेले,' असं सिंघवी त्यांच्या ट्विटमध्ये म्हणाले.