Congress President Election: पराभवानंतरही शशी थरुर यांची ही मोठी कामगिरी, जल्लोष करण्याची मिळाली संधी

Shashi Tharoor: काँग्रेसने लोकशाही पद्धतीने काँग्रेस अध्यक्ष पदाची निवडणूक घेतली. या काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत (Congress President Election) शशी थरुर यांना भलेही पराभवाला सामना करावा लागला असेल, पण असे असतानाही त्यांनी एक विशेष कामगिरी केली आहे.

Updated: Oct 20, 2022, 11:04 AM IST
Congress President Election: पराभवानंतरही शशी थरुर यांची ही मोठी कामगिरी, जल्लोष करण्याची मिळाली संधी  title=

Shashi Tharoor Vote Percentage: काँग्रेसने आपला आगामी अध्यक्ष निवडण्यासाठी लोकशाही पद्धतीने निवडणूक घेतली. काँग्रेस कार्यकारणी आणि पदाधिकाऱ्यांतून ही निवडणूक घेण्यात आली. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत (Congress President Election) बुधवारी मल्लिकार्जुन खरगे  (Mallikarjun Kharge) विजयी झाले आणि शशी थरुर  (Shashi Tharoor) यांना पराभवाला सामना करावा लागला. मात्र असे असतानाही शशी थरुन यांना आनंद साजरा करण्याची मोठी संधी मिळाली आहे. शशी थरुर काँग्रेस अध्यक्षपदावर विराजमान होऊ शकले नाहीत, पण पराभव होऊनही त्यांनी मोठी कामगिरी केली आणि निवडणुकीमुळे त्यांना मोठा फायदा झाला आहे.

पराभूत होऊनही शशी थरुर यांची मोठी कामगिरी 

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मल्लिकार्जुन खर्गे यांनी  शशी थरुर  (Shashi Tharoor) यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. मतमोजणीत मल्लिकार्जुन खर्गे यांना 7897 मते मिळाली, तर थरुर यांना केवळ 1072 लोकांनी मतदान केले. मात्र, असे असतानाही त्यांनी काँग्रेसच्या गेल्या 25 वर्षांच्या पक्षीय निवडणुकांच्या इतिहासात एक चांगली कामगिरी केली.

17 ऑक्टोबर रोजी झालेल्या काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी एकूण 9385 मते पडली होती, त्यापैकी 416 मते अवैध ठरली होती. 8969 वैध मतांपैकी 1072 मते  शशी थरुर  (Shashi Tharoor) यांना मिळाली आणि त्यांची मते 11.95 टक्के होती. त्यानुसार, 25 वर्षांच्या इतिहासात पराभूत उमेदवाराची ही सर्वोत्तम मतांची टक्केवारी आहे.

22 वर्षांपूर्वी पराभूत झालेल्याला केवळ 1 टक्के मते  

यापूर्वी 22 वर्षांपूर्वी काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक झाली होती आणि त्यानंतर सोनिया गांधी विजयी झाल्या होत्या. सोनिया गांधी यांना उत्तर प्रदेशातील जितेंद्र प्रसाद यांनी थेट लढत दिली होती. परंतु त्यांना 100 पेक्षा कमी मते मिळाली आणि त्यांची मतांची टक्केवारी सुमारे 1 टक्के होती. त्यावेळी एकूण 7771 मते पडली, त्यापैकी 229 मते अवैध ठरली आणि सोनिया गांधींना 7448 मते मिळाली.

1997 मध्येही पराभूत झालेल्यांची मतांची टक्केवारी कमी  

यापूर्वी 1997 मध्ये झालेल्या काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत तीन उमेदवार रिंगणात होते आणि सीताराम केसरी 6224 मतांनी विजयी झाले होते, तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या शरद पवार यांना 888 मते मिळाली होती आणि त्यांची मतांची टक्केवारी 11.9 टक्के होती. त्याचवेळी तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या राजेश पायलट यांना केवळ 354 मते मिळाली होती. त्यांची मतांची टक्केवारी एक टक्क्यांहून कमी होती.