Maharashtra Political Crisis: काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा CM उद्धव ठाकरेंना फोन

राज्यात तयार झालेल्या राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मुख्य़मंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर चर्चा केली आहे.

Updated: Jun 25, 2022, 10:49 PM IST
Maharashtra Political Crisis: काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा CM उद्धव ठाकरेंना फोन title=

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरी नंतर राज्यात राजकीय भूकंप झाला. त्यानंतर महाविकासआघाडी सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबत 40 हून अधिक आमदार असल्याने ठाकरे सरकार कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्य़ा नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी असल्याचं म्हटलं आहे. (Sonia Gandhi Call to CM Uddhav Thackeray)

शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात या परिस्थितीवर बरीच चर्चा झाली आहे. पण आता काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करुन राजकीय परिस्थितीबाबत चर्चा केली आहे. 

काँग्रेस शिवसेनेच्या पाठिशी असल्याची भूमिका सोनिया सोनिया गांधी यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे मांडली आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीनंतर राज्यातला संघर्ष टिपेला पोहचलाय.

दरम्यान आज एकनाथ शिंदे यांनी नवं ट्विट केलं आहे. शिवसैनिकांनो मविआचा खेळ ओळखा, मविआरूपी अजगराच्या विळख्यातून सुटकेसाठी हा लढा सुरू आहे असं ट्विट एकनाथ शिंदे यांनी केलंय.

दुसरीकडे काल रात्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्याची माहिती सूत्रांची दिलीये. गुजरातमध्ये ही भेट झाल्याचं समजतंय. त्यामुळे येत्या काळात काय नवीन समीकरणं जुळतात याबाबत लोकांना ही उत्सूकता आहे.