गोव्यातील भाजप सरकार अस्थिर, काँग्रेसचा सत्तेचा दावा

गोव्यामध्ये राजकीय हालचालींना पुन्हा एकदा वेग आला आहे.  

Updated: Mar 16, 2019, 07:30 PM IST
गोव्यातील भाजप सरकार अस्थिर, काँग्रेसचा सत्तेचा दावा title=

पणजी : गोव्यामध्ये राजकीय हालचालींना पुन्हा एकदा वेग आला आहे. गोव्यामधील भाजपा सरकार अस्थिर असल्याचे सांगत सत्तेचा दावा काँग्रेसने केला आहे. काँग्रेस पक्षाने गोव्याच्या राज्यपाल मृदला सिन्हा यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितली आहे. विरोधी पक्ष नेते बाबू कावलेकर यांनी राज्यपाल यांना इमेल आणि फॅक्स करून भेटीची वेळ मागितली आहे. या राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर आज संध्याकाळी भाजप आमदारांची बैठक होता आहे. त्यामुळे पुन्हा एकदा गोव्यात राजकीय राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

दरम्यान, गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची प्रकृती ठिक नसल्याने त्यांना डॉक्टरांच्या निगरानीखाली ठेवण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे. पर्रिकरांवर निवासस्थानीच उपचार सुरू आहेत. मुख्यमंत्र्यांची प्रकृती ठिक नसल्याने गोव्यामध्ये राजकीय हालचालींना पुन्हा एकदा वेग आल्याचे चित्र दिसत आहे. गोव्यामधील भाजप सरकार अस्थिर असल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात आला. त्यामुळेच काँग्रेसने राज्यपाल मृदला सिन्हा यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितली आहे. 

काँग्रेसने. राज्यपाल मृदुला सिन्हा यांना फॅक्सद्वारे पत्र पाठवून भेटीची वेळ मागितल्याची माहिती विधानसभेतील विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी दिली. मात्र त्यांच्या पत्राला राज्यपालांनी अजून उत्तर दिलेले नाही. सत्ता स्थापनेसाठी लागणाऱ्या २१ आमदारांचा काँग्रेला पाठिंबा असल्य़ाचा दावाही कवळेकरांनी केलाआहे. या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपानेही आपल्या आमदारांचीही आज बैठक बोलावली आहे. त्यामुळे गोव्यात सत्ता बदल होणार का की तेच सरकार राहणार याचीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.