मतदानानंतर लगेचच सुरु झालं होतं काँग्रेसचं हे प्लानिंग

निकालानंतरच काँग्रेसने सुरु केल्या होत्या हालचाली

Updated: May 16, 2018, 11:02 AM IST
मतदानानंतर लगेचच सुरु झालं होतं काँग्रेसचं हे प्लानिंग title=

बंगळुरु : कर्नाटक निवडणुकीच्या निकालानंतर भाजप जसा जसा बहुमताकडे जात होता तसं तसं काँग्रेसचं टेन्शन वाढत होतं. भाजपच्या जागा वाढताच काँग्रेसने जेडीयूला पाठिंबा जाहीर केला. यानंतर सगळेच हैराण झाले. दुसरा सर्वात मोठा पक्ष असून देखील एचडी कुमारस्वामींना मुख्यमंत्रीपदाची ऑफर देऊन टाकली. आता सूत्रांकडून माहिती मिळते आहे की, काँग्रेसने जेडीएसला समर्थन देण्याची प्लानिंग आधीच करुन ठेवली होती.

मतदानाच्या दुसऱ्या दिवशीच झाली सुरुवात

इंडियन एक्स्प्रेसमध्ये दिलेल्या बातमीनुसार काँग्रेसने जेडीएसला आपल्याकडे खेचण्यासाठी मतदानाच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 13 एप्रिल पासूनच प्रयत्न सुरु केले होते. दोन्ही पक्षांनी आधीच ठरवलं होतं की वेळ न गमवता दोघांनी एकमेकांना समर्थन करायचं. निकाल स्पष्ट होताच काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांनी यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांना फोन करुन याची माहिती दिली. एचडी देवेगौडा यांचा मुलगा एचडी कुमारस्वामी तेव्हा मुख्यमंत्री होणार जेव्हा काँग्रेस आणि जेडीएस एकत्र येतील.