मुंबई : 'इतक्या दिवसात सुंदर बना', 'तितक्या दिवसात हॅण्डसम बना' , अशा जाहिराती करणाऱ्या सेलिब्रेटींना आता चांगलाच दणका बसणार आहे.
नव्या ग्राहक संरक्षण बिलाला कॅबिनेटमध्ये मंजूरी देण्यात आली आहे. सेंट्रल कंज्यूमर प्रोटेक्शन अथॉरिटी बनविण्याचाही प्रस्ताव आहे.
यातून सर्व प्रकारच्या तक्रारींवर लक्ष देत कारवाई करण्याची शिफारस करणार आहे.
या दरम्यान सेलिब्रेटी कोणत्या जाहिरातीतून खोटी स्वप्ने दाखवत असतील तर त्यावर बंदी लागू शकते.
'न्यूज १८' ने दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट २०१५ मध्ये ग्राहक संरक्षण बिल लोकसभेत सादर करण्यात आले होते. याचे मुख्य उद्दीष्ट ३० वर्षे जुन्या असलेल्या ग्राहक संरक्षण अॅक्ट, १९८६ मध्ये बदल करणे हा होता.
संसदीय समितीने गेल्या वर्षी एप्रिलमध्ये यावर आपली शिफारस दिली आहे. नवे बिल ग्राहकांच्या हितासाठी काम तर करेलच, तसेच ब्रांड सोबत सेलिब्रेटीची असणारी जबाबदारी ठरवली जाणार आहे.
भुलवणाऱ्या जाहिराती देणाऱ्या सेलिब्रेटींवरही बंदी लागण्याची शक्यता आहे. दिशाभूल करणाऱ्या जाहिरांतीवरही कडक कारवाई होईल.
नव्या बिलात सेट्रल ग्राहक संरक्षण अॅथोरीटी गठीत केली जाईल.
ग्राहकांच्या अधिकारांना महत्त्व देणं, सुरक्षा करणं आणि त्यांना लागू करण हे याचं मुख्य उद्दीष्ट आहे.
ग्राहक संरक्षण कायद्याचा आवाज संसदेत घुमणं ही काही पहिलीच वेळ नव्हती. याआधी नरेंद्र मोदी यांनीही 'ग्राहक संरक्षण सरकारची प्राथमिकता आहे,' असे सांगितले होते.