स्पेशल रेल्वेने बंगळुरुात पोहोचलेल्या १९ प्रवाशांना कर्नाटक सरकारने माघारी पाठवले, असे का केलं?

दिल्लीतून आलेली एक विशेष रेल्वेने गुरुवार सकाळी बंगळुरु स्थानकात पोहोचली. यावेळी १९ प्रवाशांना कर्नाटक सरकारने माघारी पाठवले. 

Updated: May 15, 2020, 01:08 PM IST
स्पेशल रेल्वेने बंगळुरुात पोहोचलेल्या १९ प्रवाशांना कर्नाटक सरकारने माघारी पाठवले, असे का केलं? title=
संग्रहित छाया

बंगळुरु : दिल्लीतून आलेली एक विशेष रेल्वेने गुरुवार सकाळी बंगळुरु स्थानकात पोहोचली. यावेळी १९ प्रवाशांना कर्नाटक सरकारने माघारी पाठवले. याचे कारणही तसेच आहे. कर्नाटक सरकारचे म्हणणे आहे की, या १९ प्रवाशांनी क्वारंटाईन होण्यास नकार दर्शविला. त्यानंतर त्यांना पुन्हा दिल्लीला माघारी पाठविण्यात आले. रेल्वेच्या अधिकाऱ्यांने सांगितले की, १२ सिकंदराबाद, दोन गुंटाताल, चार अनंतपूर आणि एक नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर उतरविण्यात आले आहे.

बंगळुरु महानगर पालिकाच्या अधिकाऱ्याच्या हवाल्याने माहिती देण्यात आली आहे की,  गुरुवारी ५४३ लोक बंगळुरात पोहोचले. कमी प्रमाणात रेल्वेची सेवा सुरु आहे. कनार्टकात जाणारी ही पहिली रेल्वे होती. कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी १४ दिवसांच्या कालावधीसाठी क्वारंटाईन करण्याची गरज आहे. त्यामुळे या १९ प्रवाशांनाही क्वारंटाईन करण्यात येणार होते. मात्र, त्यांनी क्वारंटाईन होण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांना माघारी पाठविण्यात आले आहे. तर १४० प्रवाशांनी क्वारंटाई होण्यास समहती दर्शवली. त्यांनी कोणताही विरोध केला नाही, असे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. 

सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओनुसार काही प्रवासी हे क्वारंटाईन होण्यास नकार देत आहेत. प्रवासी समूहाने एकत्र उभे होते. टाळ्याही वाजवत होते. तसेच घोषणाबाजीहीकरत होते. क्वारंटाईन होणार नाही. रेल्वेनेकडून सांगण्यात आले, राज्य सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह, पोलीस आणि रेल्वेने केलेल्या चर्चेनंतर या प्रवाशांना पुन्हा माघारी पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला.

त्यानंतर १९ प्रवाशांनी परत जाण्याचा निर्णय घेतला आणि  अगदी कमी कालावधीत रेल्वेने परत पाठविले. पुन्हा रेल्वे  दिल्लीच्या दिशेने रवाना झाली. या रेल्वेला एक अतिरिक्त बोगी जोडण्यात आली.