देशभरात कोरोनाचा हाहाकार! बेफाम वेगाने पसरतोय विषाणू

 देशात कोरोनाचा उद्रेक वाढताना दिसतोय. 

Updated: Mar 22, 2021, 07:28 PM IST
देशभरात कोरोनाचा हाहाकार! बेफाम वेगाने पसरतोय विषाणू

 नवी दिल्ली :  देशात कोरोनाचा उद्रेक वाढताना दिसतोय. देशात गेल्या 24 तासांत 46 हजार 951 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. 
 
 112 दिवसांतील सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे.

आतापर्यंत 1 कोटी 16 लाख 46 हजार 081 कोरोना संसर्गामुळे ग्रस्त झाले आहेत. गेल्या 24 तासांत 212 जणांचा बळी गेला आहे.

देशभरात आतापर्यंत 1 लाख 59 हजार 967 जणांचा बळी गेला आहे. कोरोनावर गेल्या 24 तासांत 21 हजार 180 जणांनी कोरोनावर मात केली आहे. 

आतापर्यंत 1 कोटी 11 लाख 51 हजार 468 जण कोरोनामुक्त झालेत. सध्या देशभरात 3 लाख 34 हजार 646 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

हेही वाचा : आता आलाय खतरनाक हायब्रिड कोरोना व्हायरस; जगभरातील शास्त्रज्ञांच्या चिंतेत वाढ