Corona Return : गेल्या 24 तासात कोरोनाचे 66 हजार रुग्ण, भारतात 'या' ठिकाणी रेडझोन

Corona Update : देशात H3N2 इन्फ्ल्यूएंझा रुग्णांची संख्या वाढत असतानाच आता कोरोना रुग्णसंख्येतही वाढ झाली आहे. गेल्या चोवीस तासात जगभरात तब्बल 66 हजार नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. भारतातही काही राज्यांमध्ये रुग्णसंख्या वाढतेय.

Updated: Mar 20, 2023, 05:33 PM IST
Corona Return : गेल्या 24 तासात कोरोनाचे 66 हजार रुग्ण, भारतात 'या' ठिकाणी रेडझोन title=

Corona Return : जगभरात कोरोना (Corona) महामारीने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आह. भारतातही अनेक राज्यांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. महाराष्ट्र (Maharashtra) आणि गुजरातसह (Gujrat) काही राज्यांमध्ये रुग्णसंख्येतील वाढ चिंताजनक मानली जात आहे. जगभरात गेल्या चोवीस तासात कोरोनाच्या तब्बल 66 हजार नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. जसजसा उन्हाळा वाढत चालला आहे, तसतसा पुन्हा एकदा कोरोनाचा प्रकोप वाढू लागला आहे. आरोग्य विभागाने (Health Department) लोकांना खबरदारीचं आवाहन केलं आहे. गर्दीच्या ठिकाणी काळजी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. 

महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण
देशात सर्वाधिक कोरोना रुग्णसंख्येची महाराष्ट्रात नोंद झाली आहे. गेल्या चोवीस तासात महाराष्ट्रात 236 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यातले 52 रुग्ण एकट्या मुंबईत सापडले आहेत. याशिवाय ठाण्यात 33, पुणे 69, नाशिक 21, कोल्हापूर आणि अकोल्यात प्रत्येकी 13 प्रकरणं समोर आली आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाने हि माहिती दिली आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची एकूण संख्या 81,39,737 इतकी झाली आहे. दरम्यान गेल्या चोवीस तासात कोरोनामुळे मृत्यू झाल्याची एकही नोंद नाही.

दिल्लीतही पॉझिटिव्हिटी रेट वाढला
राजधानी दिल्लीत रविवारी तब्बल 72 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. दिल्लीतला पॉझिटीव्हिटी रेट 3.95 इतका झाला आहे. दिल्ली आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार दिल्लीत H3N2 रुग्णांबरोबरच कोरोना रुग्णसंख्येतही वाढ होत आहे. 

देशात कोरोना रुग्णसंख्येत वाढ
देशभरात गेल्या 24 तासात कोरोनाचे 918 रुग्ण सापडले आहेत. देशात आता कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 6350 इतकी झाली आहे, तर पॉझिटीव्हिटी रेट 2.08 टक्के इतका झाला आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 92.03 कोटी लोकांची कोविड तपासणी करण्यात आली आहे. तर गेल्या चोवीस तासात 44,225 टेस्ट करण्यात आल्या आहेत. गेल्या 24 तासात 479 लोकं कोरोनातून बरी होऊन घरी गेली. 

भारतात तब्बल 129 दिवसांनंतर एक हजाराहून अधिक रुग्ण सापडले आहेत. देशात रविवारी तीन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यात  महाराष्ट्र, राजस्थान आणि केरळातील प्रत्येकी रुग्णाचा समावेश आहे. 

वैद्यकीय तज्ज्ञांचा दावा
भारतात चार महिन्यांनंतर कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. देशात कोरोना रुग्णसंख्या वाढण्यामागे कोविड-19 XBB चा सब व्हेरिएंट XBB 1.16 कारणीभूत असल्याचा तज्ज्ञांचा दावा आहे. भारताशिवाय चीन, सिंगापूर, अमेरिकेत हा व्हेजिएंट वेगाने पसरतोय. एका अहवालानुसार  सब व्हेरिएंट XBB 1.16 मुळे कोरोनाच्या नव्या लाटेची भीती व्यक्ती केली जात आहे. आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी केलेल्या दाव्यानुसार नव्या  सब व्हेरिएंट XBB 1.16 चे सर्वाधिक रुग्ण भारतात आहेत.