मानवतेला लाज आणली, कोरोना बाधित आईला घरात डांबून मुलाचे पलायन

कोरोनाव्हायरस (Coronavirus)साथीच्या आजारात माणुसकीचे वेगवेगळे रुप लोकांना पाहायला मिळत आहे.  

Updated: May 4, 2021, 10:17 AM IST
मानवतेला लाज आणली, कोरोना बाधित आईला घरात डांबून मुलाचे पलायन  title=
संग्रहित फोटो

मुंबई : कोरोनाव्हायरस (Coronavirus)साथीच्या आजारात माणुसकीचे वेगवेगळे रुपे पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी लोक आपल्या प्रियजनांना या आजारापासून वाचवण्यासाठी आपला जीव धोक्यात घालत आहेत, तर अन्य ठिकाणी स्वत: चा बचाव करण्यासाठी  आपल्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडून देत असल्याच्या घटनाही पुढे आल्या आहेत. अशीच एक घटना उत्तर प्रदेशातील आग्रा येथे घडली आहे. स्वत:च्या मुलाने आईलाच  घरात कोंडून सोडून पळ काढला.

आईला खोलीत केले बंद

आग्रा येथे कोरोना विषाणूसंबंधित अशी घटना उघडकीस आली आहे. ज्याने मानवतेला लाज आणली आहे. मुलाला जन्म देणारी आई. कोरोनाच्या संकटामध्ये हाच मुलगा आणि सूनेने आपल्या आईला घरात कोंडून पलायन केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना कमला नगर कोठी क्रमांक 192 मधील आहे. मुलाने आपल्या आईला खोलीत बंद करुन कुलूप लावून पळून गेला. त्याला भीती होती की, वृद्ध झाल्यामुळे आई कोरोनाबाधित (Coronavirus)असेल या भीतीपोटी त्याने आपल्या आईलाच घरात कोंडले.

नातवांनी आजीला बाहेर काढले

वृद्ध महिलेला तिच्या खोलीत बंद करण्यात आल्याची माहिती तिच्या नातवंडांना मिळाली. नातवंडानी आजीला वाचविण्यासाठी घराबाहेर पडली. नातवंडानी  112 ला फोन करून पोलिसांना माहिती दिली. यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी नातवंड यांच्या सहाय्याने दाराचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला,  मात्र, कुलूप उघड नव्हते. त्यानंतर पोलिसांनी दुसरा दरवाजा तोडून त्या महिलेला बाहेर काढले. त्यामुळे या वृद्ध महिलेचा जीव वाचवला. याप्रकरणी पोलिस तपास करत आहेत.

कोटा येथे वृद्ध दाम्पत्याने केली आत्महत्या 

दुसऱ्या एका घटनेत, राजस्थानमधील कोटा (Kota)येथे वेगळेच प्रकरण समोर आले आहे. तेथे वृद्ध दाम्पत्याने आपला नातू आणि त्यांची सून कोरोना संसर्गापासून वाचवण्यासाठी रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केली.

 ज्येष्ठ जोडप्याला झाला कोरोना

रेल्वे कॉलनी पोलीस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक रमेश चंद शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार 75 वर्षीय हिरालाल बैरवा आणि त्यांची 70 वर्षीय पत्नी शांतीबाई पुरोहित यांना कोरोनाची लागण झाली होती. आपल्या 18 वर्षांचा नातू आणि सून यांच्यासोबत शहरातील टपरी परिसर येथे राहत होती. आठ वर्षांपूर्वी त्यांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे.

मुलांना वाचवण्यासाठी आपला जीव दिला

वृद्ध दांपत्याला 29 एप्रिल रोजी  कोरोना संसर्ग (Coronavirus)झाल्याची माहिती मिळाली. तेव्हापासून हे दोघे वेगवेगळ्या खोल्यांमध्ये क्वारंटाईन होते. कोरोना झाल्यापासून दोघेही तणावात होते. आपल्यामुळे आपल्या नातवाला आणि सूनेलाही कोरोनाचे संक्रमन होऊ शकते, अशी भीती त्यांना होती. यानंतर रविवारी सकाळी दोघेही चंबळ ओव्हरब्रिजजवळील दिल्ली-मुंबई अप ट्रॅकवर रेल्वेसमोर उडी मारली. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला.