कोरोना काळात तिरुपतीच्या चरणी भक्ताकडून 1 कोटी सोन्याची तलवार दान

तिरुमलाच्या श्री वेंकटेश्वर स्वामी देवाला एका भक्तानं सोन्याची तलवार अर्पण केली. 

Updated: Jul 20, 2021, 05:08 PM IST
कोरोना काळात तिरुपतीच्या चरणी भक्ताकडून 1 कोटी सोन्याची तलवार दान

हैदराबाद: कोरोना काळात सध्या मंदिरं बंद आहेत. मात्र तरीही लोक मंदिरांसाठी वेगवेगळ्या स्वरुपात आपली भक्तीपोटी दान करत असतात. तिरुपती हे अनेकांचं श्रद्धास्थान आहे. तरुपतीला पैसे, कपडे किंवा सोनं-चांदीच्या वस्तू दान करतात. मात्र एका उद्योगपतीनं सोन्याची तलवार दान केली आहे. या उद्योगपतीनं दान केलेल्या  तलवारची सर्वत्र चर्चा होत आहे. 

तिरुमलाच्या श्री वेंकटेश्वर स्वामी देवाला एका भक्तानं सोन्याची तलवार अर्पण केली. हैदराबादमधील उद्योजक एम एस प्रसाद यांनी ही 5 किलोची तलवार देणगी दाखल सुपूर्द केली आहे. 

या कट्यारमध्ये 2 किलो सोनं आणि 3 किलोची चांदी आहे. तलवारीची किंमत जवळपास एक कोटी आहे. या तलवारीला सूर्यकटारी म्हणतात. वेदिक परंपरेनुसार सूर्यकटारी हे तिरुमला पर्वतांत वास्तव्यास असलेल्या वेंकटेश्वराचं शस्त्र आहे असं मानलं जातं. त्या वर्णनानुसारच ही तलवार तयार करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. 

सूर्य कटारीचा अर्थ सूर्यासारखी तळपणारी तलवार असा होतो. एक कोटीची ही सोन्याची कट्यार खूप आकर्षक आहे. हैदराबादचे उद्योगपती एम एस प्रसाद यांनी ही तलवार तिरुपती चरणी आपल्या भक्तीखातर दान म्हणून दिली आहे.