तुम्ही निवडून दिलेल्या खासदाराला पगाराव्यतिरिक्त मिळतात 'या' सुविधा!

MP Salary, Facility: खासदारांना मिळणार अधिनियम 1954 अंतर्गत खासदारांना पगार, भत्ता आणि पेन्शन अशा सुविधा दिल्या जातात. 

Pravin Dabholkar | Updated: Apr 26, 2024, 04:19 PM IST
तुम्ही निवडून दिलेल्या खासदाराला पगाराव्यतिरिक्त मिळतात 'या' सुविधा! title=
MP Salary facilities

MP Salary, Facility: देशभरात सध्या लोकसभा निवडणुकीची चर्चा आहे. महाराष्ट्रात 7 टप्प्यात निवडणुका होतायत. सध्या राजकीय पक्ष आणि त्यांचे उमेदवार मतदार संघात जाऊन मतदान करण्याचे आवाहन करत आहेत. खासदार बनवण्यासाठी ही निवडूक होतेय. काही मतदार आधीच्या विकास कामांवर आहे त्याच खासदाराला निवडून देतील. तर काही ठिकाणी नव्या उमेदवाराला खासदार म्हणून संधी दिली जाईल. पण तुम्ही निवडून दिलेल्या खासदाराला किती पगार मिळतो? कोणत्या सुविधा मिळतात? याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? खासदार हा लोकसभेचा सदस्य असतो. खासदारांना मिळणार अधिनियम 1954 अंतर्गत खासदारांना पगार, भत्ता आणि पेन्शन अशा सुविधा दिल्या जातात. 

वेगळा भत्ता 

एक खासदर संसदेच्या कोणत्या सदनाच्या सत्रामध्ये किंवा समितीच्या बैठकीत उपस्थित राहिल्यास किंवा संसद सदस्य म्हणून कोणत्या कामासाठी प्रवास करत असेल तर त्याचा वेगळा भत्ता दिला जाईल. रस्ते मार्गे प्रवास करत असेल तर खासदाराला 16 रुपये प्रति किलोमीटरप्रमाणे वेगळा भत्ता दिला जातो. 

घरापासून ऑफिसपर्यंत पोहोचण्यासाठी भत्ता 

खासदाराला प्रत्येक महिन्यात 70 हजार रुपये निर्वाचन क्षेत्र भत्ता म्हणून मिळतात. याव्यतिरिक्त खासदाराला दिल्लीतील आपले राहण्याचे ठिकाण किंवा दिल्लीतील कार्यालयात टेलिफोनचे शुल्क द्यावे लागत नाही. त्यांना 50 हजार मोफत लोकल कॉल्सची सुविधा दिली जाते. खासदारांना कार्यालयीन भत्ता म्हणून दर महिन्याला 60 हजार रुपये मिळतात. 

प्रवास आणि वैद्यकीय सुविधा 

एका खासदाराला एक पास दिला जातो. ज्याद्वारे तो रेल्वेमध्ये मोफत प्रवास करु शकतो. हा पास कोणत्याही ट्रेनच्या फर्स्ट क्लास एसी किंवा एक्झिक्युटीव्ह क्लासचा असतो. कामासंदर्भात परदेशी प्रवास करण्यासाठी खासदारांना स्वतंत्र भत्ता मिळतो. यासोबत वैद्यकीय सुविधादेखील पुरवली जाते. 

खासदाराचे काम काय?

तुम्ही निवडून दिलेल्या खासदाराकडे त्याच्या क्षेत्राचा विकास करण्याची जबाबदारी असते. जनतेशी संबंधित मुद्दे आणि प्रश्न तो लोकसभेत मांडतो. लोकसभेत कोणता कायदा पास करायचा असतो तेव्हा मतदान घेतले जाते. याव्यतिरिक्त राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकीत त्यांची थेट भूमिका असते. ते वेगवेगळ्या समित्यांवर राहून देशाच्या भल्याचे काम करतात.

खासदाराचा पगार?

पगाराबद्दल बोलायचं झालं तर खासदाराला एक महिन्याला 1 लाख रुपये इतका पगार मिळतो. यासंदर्भात 1 एप्रिल 2023 पासून एक नवा नियम लागू करण्यात आला आहे. ज्यानुसार खासदारांचे पगार आणि दैनंदिन भत्त्यात प्रत्येक 5 वर्षांनी वाढ केली जाणार आहे.