Covid 19 Omicron Variant : भारतात रुग्णांमध्ये होतेय घट, चौथ्या लाटेची शक्यता किती?

देशात कोरोनामुळे एकूण मृतांची संख्या आता 5,21,070 वर पोहोचली आहे. 

Updated: Mar 30, 2022, 06:52 PM IST
Covid 19 Omicron Variant : भारतात रुग्णांमध्ये होतेय घट, चौथ्या लाटेची शक्यता किती? title=

Covid 19 Cases in India : देशभरात कोरोना संसर्गाची प्रकरणे झपाट्याने कमी होत आहेत. भारतात आज एकूण 1259 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी दिलेल्या कोविड अपडेटनुसार, काल भारतात 1259 नवीन कोरोना विषाणूची प्रकरणे नोंदली गेली. तर विविध राज्यांमध्ये आणखी ३५ कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, सक्रिय रुग्णांची संख्या 15378 वर आली आहे.

आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, कोविड रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.75 टक्के आहे. येथे, Co-WIN डॅशबोर्डनुसार, देशात आतापर्यंत 183.73 कोटीहून अधिक कोरोना लसीचे डोस दिले गेले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की, अमेरिका सारख्या अशाच बाधित देशांच्या तुलनेत भारतात दर दशलक्ष लोकसंख्येमागे 374 कोरोना संसर्गाने मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या सर्वात कमी आहे. ब्राझील, रशिया आणि मेक्सिको हे देखील कमी मृत्यूदर असलेल्या देशांमध्ये आहेत.

देशात कोरोनामुळे एकूण मृतांची संख्या आता 5,21,070 वर पोहोचली आहे. सरकारी आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 1705 लोकांनी कोरोनावर मात केली आहे. देशभरात लसीकरणाअंतर्गत आतापर्यंत 183 कोटी 53 लाख 90 हजार 499 डोस देण्यात आले आहेत. काल 25 लाख 920 हजार 407 डोस देण्यात आले.

देशात कोविड विरोधी लसीकरण मोहीमेनंतर भारतातील कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने घट होत असल्याने दिलासा मिळण्याची चिन्हे दिसत आहेत.

चीनमध्ये कोरोनाची प्रकरणे वाढू लागली आहेत. काही शहरात पुन्हा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. काही देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असताना भारतात मात्र परिस्थिती नियंत्रणात आहे.