नवी दिल्ली : कोरोना लसीसंदर्भात मोठी आणि चांगली बातमी समोर येतेय. अमेरिकन कंपनी फायझरच्या लसीची तिसऱ्या टप्प्यातली चाचणी ९० टक्के यशस्वी झालीय. अमेरिकन कंपनी फायझरच्या चाचण्या युरोपात सुरू होत्या. त्यांना मोठं यश मिळाल्यानं आता लवकरच युरोपमध्ये ही लस दिली जाण्याची शक्यता आहे.
ही वॅक्सिन ९० टक्के यशस्वी आहे. पण खूपच थंड वातावरणात ही ठेवावी लागते. यासाठी कोल्ड स्टोरेज लागतं. कोल्ड स्टोअरची यंत्रणा भारतभर पोहोचवणं हे आव्हान आहे. ज्या लोकांना वॅक्सिन द्यायचीय त्यांना कोल्ड स्टोरेजपर्यंत आणावे लागेल. भारताला याचे प्रोडक्शन करण्याची परवानगी मिळेल. याच्या कॉपीज पटापट करता येतील. त्यामुळे भारतासाठी ही खूप दिलासादायक बातमी असल्याचे डॉ. रवी गोडसे यांनी 'झी २४ तास' ला सांगितले.