Credit Card ची थकबाकी वेळेवर भरली नाही तर भरावा लागेल मोठा दंड, काय सांगतो नियम जाणून घ्या

Credit Card use : नेहमीच किमान रकमेपेक्षा जास्त पैसे देण्याचा प्रयत्न करा. केवळ कमीतकमी रक्कम भरल्यास कर्जाच्या जाळ्यात अडकण्याची शक्यता वाढू शकते. 

Updated: Dec 12, 2022, 03:52 PM IST
Credit Card ची थकबाकी वेळेवर भरली नाही तर भरावा लागेल मोठा दंड, काय सांगतो नियम जाणून घ्या title=

Credit Card : कोरोना महामारीनंतर क्रेडिट कार्डचा (Credit Card) वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. क्रेडिट कार्डमुळे शॉपिंग करणे अगदी सोपे आहे, परंतु क्रेडिट कार्डचे बिल वेळेवर भरणे देखील आवश्यक आहे. बिल वेळेवर भरले नाही तर मोठा दंड भरावा लागेल. अनेकजण कार्ड वापरत असताना शिस्त न बाळगल्याने कर्जाच्या कचाट्यात सापडत आहेत. अशातच क्रेडिट कार्डची थकबाकी भरली नाही तर दंड भरावा लागतो का ? असा अनेकांना प्रश्न पडत असतो.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) नियमांनुसार, क्रेडिट कार्ड जारी करण्याची जबाबदारी ज्या संस्था किंवा बँकेची (bank) आहे त्यांनाच फक्त ग्राहकांकडून कर्जाची रक्कम घेता येते. हे लक्षात घ्या की बँका हे शुल्क फक्त तीन दिवस उशीरा पेमेंट चुकवल्यानंतरच घेऊ शकतात. 21 एप्रिल 2022 रोजी, RBI ने क्रेडिट आणि डेबिट कार्डशी संबंधित एक अतिशय महत्त्वाचा नियम जारी केला आहे.

 क्रेडिट कार्ड (Credit Card) जारी करणारी संस्था किंवा बँकेला केवळ तीन दिवसांपेक्षा जास्त काळ क्रेडिट कार्डची थकबाकी भरली नसेल तेव्हाच त्या ग्राहकाकडून विलंब पेमेंट घेता येते. जर तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत असाल तर तुम्हाला क्रेडिट कार्डशी संबंधित या नियमाची माहिती असणे खूप गरजेचे आहे. जर तुम्ही शेवटच्या तारखेपर्यंत क्रेडिट कार्ड पेमेंट केले नसेल तर तुमच्याकडे बिल भरण्यासाठी तीन दिवस आहेत.

किमान रकमेपेक्षा जास्त पैसे

नेहमीच किमान रकमेपेक्षा जास्त पैसे देण्याचा प्रयत्न करा. केवळ कमीतकमी रक्कम भरल्यास कर्जाच्या जाळ्यात अडकण्याची शक्यता वाढू शकते. उच्च व्याजदराच्या क्रेडिट कार्डमध्ये फक्त कमीतकमी शिल्लक भरल्यामुळे आपले कर्ज अधिक व्याजामुळे मोठ्या प्रमाणावर वाढते.

स्वयंचलित पेमेंट

स्वयंचलित पेमेंट सुविधेचा अवलंब करणे हा एक योग्य पर्याय आहे. वेळेवर बिल न भरल्यास दंड टाळण्यासाठी स्वयंचलित पेमेंट सुविधा उपयुक्त आहे. हे उशीरा पेमेंट फी आणि अधिक व्याज देण्यापासून वाचवेल.

स्टेटमेंट नियमितपणे तपासा

कोणत्याही अतिरिक्त शुल्काबद्दल आणि फसवणुकीच्या व्यवहाराबद्दल जागरूक राहण्यासाठी आपली मासिक क्रेडिट कार्ड स्टेटमेंट नियमितपणे तपासा.