Crime Story: अल्पवयीन मुलीसोबत पळून गेली दोन मुलांची आई; नक्की काय भानगड?

Zharkhand Crime Story: हल्ली समलैंगिक संबंधांची प्रकरणं वाढताना दिसत आहेत. त्याचबरोबर यातही गुन्हेगारीही वाढते आहे. सध्या असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Updated: Jan 4, 2023, 04:53 PM IST
Crime Story: अल्पवयीन मुलीसोबत पळून गेली दोन मुलांची आई; नक्की काय भानगड? title=
crime

Zharkhand Crime Story: हल्ली सगळीकडे आता समलैंगिक संबंध (LGBTQ) आणि विवाहांचे प्रश्न वाढायला लागले आहेत. त्यामुळे सगळीकडेच त्यासंबंधीची अनेक प्रकरणेही समोर येयला फारसा वेळ लागत नाही. कधी कधी या सगळ्या प्रकरणाचे रूपांतर गुन्हेगारीतही (Crime Story) होते. सध्या असाच एक प्रकार झारखंडमध्ये घडताना दिसत आहे. एका दोन मुलांच्या आईनं चक्क एका अल्पवयीन मुलीला पळवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे आणि त्या दोघींचे बाहेर प्रेम प्रकरण होते (Lesbian) आणि त्या दोघी समलैंगिक आहेत असा संशय व्यक्त केला जातो आहे. परंतु या प्रकरणानं सगळीकडेच खळबळ माजवली आहे. या बातमीनं अल्पवयीन मुलीच्या आईनं पोलिसात तक्रार (Police) केली आहे. ही महिला तिच्या मुलीला अनेक दिवस फूस लावत होती आणि तिनंच तिला पळवलं आहे असा संशयही व्यक्त करण्यात आला आहे. (
Crime News Mother of 2 children ran with another girl because of she wanted to marry her shocking lesbian love story viral)

आता पोलिसांत या आईनं तक्रार केली आहे. त्यामुळे यासंबंधी पोलिस पुढील तपास सुरू करत आहेत. झारखंड येथील कोळसानगरी येथे असलेल्या धनबाद येथे समलैंगिक विवाहासाठी एका महिलेनं दुसऱ्या एका अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार (Shocking News) घडला आहे. ही अल्पवयीन मुलगी धनबाद जिल्ह्यातल्या भूली ठाण्यांअंतर्गत असलेल्या सी ब्लॉकमध्ये राहत होती. ही मुलगी घरातून अनेक दिवस बाहेर होती त्यामुळे तिच्या आईलाही चिंता वाटू लागली होती. तेव्हा या दोन मुलांची आईदेखील 15 डिसेंबरपासून गायब असल्यानं आपल्या मुलीच्या पळून जाण्यामागे या महिलेचा हात असल्याचा दाट संशय मुलीच्या आईला आहे. अल्पवयीन मुलीच्या आईनं मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार ख्रिसमसनंतर म्हणजे 26 डिसेंबरला नोंदवली आहे.

धनबाद जिल्ह्याच्या ग्रामीण पोलिस अधीक्षकांकडे मुलीच्या आईनं ही तक्रार नोंदवली आहे. या महिलेनं आपल्या मुलीला पळवून नेल्याचा तिच्या आईनं गंभीर आरोप केला आहे. धनबादचे पोलीस उपअधीक्षक (वन मुख्यालय) अमर कुमार पांडे (Kumar Pandey) यांनी या तक्रारीबद्दल माहिती दिली आहे. 

हेही वाचा - Got Catched! शाहरूखचा लेक Aryan Khan करतोय Nora Fatehi ला डेट?

स्थानिकांचा खळबळजनक खुलासा - 

ही महिला कायमच या मुलीच्या मागेपुढे करत होती. तिला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी आणि आपल्या जवळ येण्यासाठी या महिलेनं तिला फूसही लावली होती. अल्पवयीन मुलींच्या कुटुंबियांचा असाही आरोप आहे की ही महिला या मुलीच्या मागेमागे सतत करत आली होती. त्यातून स्थानिकांनी असं सांगितलं आहे की या दोघी एकमेकींसोबतच पळून गेल्या आहेत. त्याचसोबत या महिलेनंच हे कृत्य केलं असल्याचं काही स्थानिक ठामपणे सांगत आहेत. याबद्दल पोलिस तपास करत आहेत. अल्पवयीन मुलीच्या आईनं आपल्या मुलीचा आणि त्या महिलेचाही फोटो पोलिसांच्या हवाली केला आहे. आपल्या मुलीला त्या अनोळखी महिलेच्या ताब्यातून सोडवावं अशी विनंतीही या माऊलीनं पोलिसांकडे केली आहे. 

कसा सुरू आहे तपास - 

या दोघींचाही तपास जोरात सुरू आहे त्यामुळे या दोघींचा तपास लागेल असं पोलिसांचे म्हणणे आहे. या दोघींचा ठिकठिकाणी शोध सुरू आहे. परंतु हे प्रकरण नक्की कसलं आहे, यात खरंच मानवी तस्करी आहे की समलैंगिक संबंधाचा ्प्रकार की आणखी काही याबद्दल अद्याप खुलासा नाही परंतु याचा तपास सध्या सुरू आहे.