क्राईम सीरियल पाहून खेळता खेळता १० वर्षाच्या मुलीने लावून घेतला फास

हापूडच्या कोतवाली भागातील मोहल्ला नबी करीम येथे तिसरीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यीनीचा फाशीमुळे मृत्यू झाला. पोलिसांच्या माहितीनुसार, सुरुवातीला ही हत्या की काय असा संशय पोलिसांना होता. मात्र चौकशीनंतर खेळता खेळता मुलीचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. 

Updated: Mar 28, 2018, 04:46 PM IST
क्राईम सीरियल पाहून खेळता खेळता १० वर्षाच्या मुलीने लावून घेतला फास title=

नवी दिल्ली : हापूडच्या कोतवाली भागातील मोहल्ला नबी करीम येथे तिसरीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यीनीचा फाशीमुळे मृत्यू झाला. पोलिसांच्या माहितीनुसार, सुरुवातीला ही हत्या की काय असा संशय पोलिसांना होता. मात्र चौकशीनंतर खेळता खेळता मुलीचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. 

Seeing Crime Serial 10 year old girl hanged in hapur

मुलांनी उघडले रहस्य

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिमरन आपल्या मित्रांसोबत शेजाऱ्यांच्या घरात क्राईम शो पाहत होती. यावेळी खेळता खेळता तिने ओढणीच्या सहाय्याने फाशी लावून घेतली. फास इतका जोरात होता की सिमरनचा जागीच मृत्यू झाला. 

सिमरनने फाशी लावून घेतल्यानंतर तिला वाचवण्याचा प्रयत्न मुलांनी केला. मुलांनी ओढणी कापून तिला खाली घेतले. खूप वेळ सिमरन उठत नव्हती तेव्हा मुलांनी तिचे शव सिमेंटच्या कट्ट्याजवळ ठेवले आणि आपल्या घरी निघून गेली. Seeing Crime Serial 10 year old girl hanged in hapur

मृतदेहाचे पोस्टमार्टेम

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी पोस्टमार्टेम करुन मृतदेह घरच्यांच्या ताब्यात दिला. मुलींच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार मुले अनेकदा एकटी टीव्ही सीरियल पाहत असतं.  मात्र असं काही घडेल असे वाटलेही नव्हते. मुलीचा मृत्यू श्वास गुदमरल्याने झाला.