शिकारीचा थरार! मगरीची कुत्र्यावर झडप, जीव वाचवण्यासाठी धडपड, व्हिडीओ

क्षणार्धात कुत्र्यावर झडप घातली 

Updated: May 28, 2021, 10:12 AM IST
शिकारीचा थरार! मगरीची कुत्र्यावर झडप, जीव वाचवण्यासाठी धडपड, व्हिडीओ title=

मुंबई : प्राण्यांच्या शिकाराची व्हिडीओ सोशल मीडियावर चांगला व्हायरल होतो. पण पहिल्यांदाच मगरीने चक्क कुत्र्याची शिकार केल्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. नदीकाठी अतिशय सावधपणे फिरणाऱ्या कुत्र्यावर मगरीने अतिशय चतुराईने झडप घातली आहे.(Crocodile hunted Dog in Chambal river in Rajasthan : Video )  त्याची शिकार केली. या घटनेचा थरारक व्हिडीओ समोर आला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ राजस्थानमधील चंबळ नदीच्या (Chambal River) काठावरील आहे. कुत्रा बेसावधपणे नदीकाठी काही खायला मिळतं का? याच्या शोधात होता. यावेळी मगरीनं अगदी शांतपणे येऊन कुत्र्यावर हल्ला केला. 

कुत्र्याला काही समजायच्या आतच त्याची शिकार झाली होती. मगरीने कुत्र्यावर झडप घातली आणि सरळ नदीत आत घेऊन गेली. कुत्र्याने सुटकेसाठी झटापट केली पण त्याचा काही फायदा झाला नाही. 

गेल्या मंगळवारी दुपारी तीनच्या दरम्यान येथील रावतभाटा येथे शूट केला असल्याचं सांगण्यात येत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 

दुसऱ्या व्हिडीओमध्ये एका तलावात एक बेट तयार झालं आहे, या बेटावरच एक मगर आरामात झोपल्याचं दिसतंय. त्यावेळी एका बिबट्याची नजर त्या मगरीवर जाते आणि तिची शिकार करण्यासाठी बिबट्या तलावात उतरतो. दबक्या पावलांनी तो मगर असलेल्या बेटाजवळ हळू हळू येतो आणि काही समजायच्या आतच मगरीवर झडप घालतो. बिबट्याने केलेल्या शिकारीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.