डी मार्टच्या या 10 सोप्या गोष्टी शिकवतात व्यवसायात यशस्वी कसं व्हायचं

डी मार्ट सारखा यशस्वी उद्योग सुरू करण्यासाठी या 10 चुका कधीही करू नका

Updated: Sep 27, 2021, 08:34 PM IST
डी मार्टच्या या 10 सोप्या गोष्टी शिकवतात व्यवसायात यशस्वी कसं व्हायचं title=

मुंबई: बाजारात गेल्यानंतर प्रत्येक गोष्ट वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन घेणं म्हणजे वेळखाऊ काम. पण याच गोष्टी आहे त्या किंमतीपेक्षा थोड्या स्वस्त आणि एकाच ठिकाणी मिळाल्या तर? ही संकल्पना श्री राधाकिशन दमानी आणि त्यांच्या कुटुंबाला सूचली. सणासुदीच्या काळात मोठ्या प्रमाणात खरेदी करावी लागते. अशावेळी स्वस्तात वस्तू घेण्यासाठी 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा एकाच ठिकाणी वस्तू कमी किंमतीत ग्राहकांना उपलब्ध करून देण्याची कल्पना अगदी हीट ठरली.

श्री राधाकिशन दमानी यांनी डी मार्ट आणलं. या डी मार्टमध्ये अगदी किराणापासून ते कपड्यांपर्यंत लहान मुलांपासून ते गृहउपयोगी वस्तूंपर्यंत अनेक गोष्टी एकाच छताखाली ग्राहकांना मिळू लागल्या. या डी मार्ट स्टोअरचं पहिलं लक्ष्य होतं ते म्हणजे ग्राहकांना जास्तीत जास्त बोलवणं आणि स्वस्तात गोष्टी देणं. जास्त वस्तुंची विविधता देण्यापेक्षा कमी वस्तू पण स्वस्त दरात उपलब्ध करून देणं. 

2002 मध्ये पहिल्यांदा डी मार्ट ही संकल्पना आली. आता महाराष्ट्रासोबत गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, छत्तीसगढ, एनसीआर, तमिळनाडू, पंजाब आणि राजस्थानमध्ये ही साखळी पसरली आहे. श्री राधाकिशन दमानी यांनी स्थानिक उत्पादकांशी संपर्क साधून तिथून थेट सामनाची खरेदी करून ते डी मार्टमध्ये विकायचं असं ठरवलं. त्यांनी उभ्या केलेला हा व्यवसाय आणि त्यांच्या यशामागचं नेमकं गमक काय होतं ते आज आपण जाणून घेणार आहोत. 

दमानी यांनी सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्यवसाय करताना दूरदृष्टी ठेवली. भरभर नफा मिळवण्या ऐवजी व्यवसायाला गती कशी येईल याकडे लक्ष्य केंद्रीत केलं. 

कोणतीही घाई न करता छोट्यापासून सुरुवात करून नंतर मोठी साखळी उभी केली. त्यामुळे व्यवसायाचा विस्तार करताना समस्यांचा सामना करणं अधिक सोपं झालं. तुलनेनं समस्या कमी आल्या. 

उत्पादक, ग्राहक दोन्ही अत्यंत महत्त्वाचे आहेत. ही गोष्टी त्यांनी आपल्या डोक्यात आणि मनात पक्की केली होती. त्यामुळे दोन्ही आनंदी असतील असा कायमच प्रयत्न ठेवला. ग्राहकांसाठी डी मार्ट कायमच भरलेलं ठेवलं. 

त्यामुळे अमूक एक गोष्ट नाही यासाठी ग्राहकांना रिकाम्या हाताने जावं लागलं नाही. विक्रेता आणि पुरवठादार दोन्ही सामाधानी राहातील यावर जास्त भर दिला. 

ग्राहकांना आपल्या आकर्षक किंमती आणि अगदी साध्या पद्धतीनं सुटसुटीतपणे सेवा दिली. मोठ्या प्रमाणात सूट दिली. विक्री वाढवणं हे एकमेव ध्येय समोर ठेवलं. त्यामुळे लोक जास्तीत जास्त खरेदी करू लागले. 

दमानी यांनी दिखाऊपणा टाळला. कमी वैविध्य पण चांगली उत्पादन ग्राहकांना खिशाला परवडेल अशा दरात उपलब्ध करून दिली. 

उत्पादन कमी पण साधा आणि पुरवठा दोन्ही कायम जास्त राहायला हवा याकडे लक्षं दिलं. कमी किंमत असली की लोकांची पावलं आपसुकच पुन्हा आपल्या डी मार्टकडे वळणार हे त्यांनी पक्क ओळखलं होतं. 

सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी उधारी टाळली. उधारीचा परिणाम व्यवसायावर नेतं.