खतरनाक VIDEO : दुसरी कार असती तर जीव गेला असता, आनंद महिंद्रांचे कौतुक

महिंद्रा समूहाचे (Mahindra Group) अध्यक्ष आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर XUV700 ची एका बसला जोरदार धडक बसली. या खतरनाक टक्करचा व्हिडिओ शेअर केला आहे. 

Updated: Mar 26, 2022, 06:20 PM IST
खतरनाक VIDEO : दुसरी कार असती तर जीव गेला असता, आनंद महिंद्रांचे कौतुक title=

मुंबई : महिंद्रा समूहाचे (Mahindra Group) अध्यक्ष आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर XUV700 ची एका बसला जोरदार धडक बसली. या खतरनाक टक्करचा व्हिडिओ शेअर केला आहे. अपघात इतका भीषण होता की XUV700 बसला धडकल्यानंतर बसने दिशा बदलली. मात्र, कार जाग्यावरच राहिली.

महिंद्रा कार आजच्या तारखेत सर्वोत्तम सुरक्षा वैशिष्ट्यांसह येत आहेत आणि नुकत्याच समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे पुन्हा सिद्ध झाले आहे. हा व्हिडिओ शेअर करत आनंद महिंद्रा यांनी XUV700 चे कौतुक केले आहे. या व्हिडिओमध्ये महिंद्रा XUV700 आणि तामिळनाडू परिवहन बसची जोरदार टक्कर होताना दिसत आहे. महिंद्रा एसयूव्ही सुरक्षेच्या दृष्टीने इतकी मजबूत निघाली की टक्कर होऊन बसची दिशा बदलली. यावरून हे स्पष्ट होते की महिंद्रा कारची बिल्ड क्वालिटी खूप मजबूत आहे, कारण इतक्या मोठ्या आकाराच्या बसला धडकणे आणि तिची दिशा बदलणे ही मोठी गोष्ट आहे.

दुसरी कार असती तर जीव गेला असता !

दुसरी कार असती तर पुढच्या दोन प्रवाशांना गंभीर दुखापत झाली असती किंवा मृत्यूही ओढावला असता, पण महिंद्रा XUV700 ने इथे चमत्कार घडवला आहे. हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करत आनंद महिंद्रा यांनी लिहिले की, “प्रवासी सुरक्षित असल्याचा सर्व प्रथम मला आनंद आहे. सुरक्षा ही आमच्या सर्व वाहनांची सर्वात महत्वाची रचना आहे. नव्या वाहनाने या तत्त्वाला अधिक बळ दिले आहे. मी आमच्या टीमचे कौतुक करतो. ज्यांनी डिझाइनवर खूप मेहनत घेतली आहे आणि पुढे जाऊन ते आणखी चांगले बनवण्यासाठी काम करतील.”

नवीन XUV700 ची दीर्घ प्रतीक्षा 

महिंद्राने काही महिन्यांपूर्वी भारतीय बाजारपेठेत नवीन XUV700 लॉन्च केली आहे, जी ग्राहकांना खूपच पसंत पडत आहे. लोक ही कार खरेदी करण्यास उत्सुक आहेत. कंपनीने 7 ऑक्टोबर 2021 रोजी एसयूव्हीसाठी बुकिंग सुरू केले आणि अवघ्या 4 महिन्यांत 1 लाखांहून अधिक ग्राहकांनी ही कार बुक केली. नवीन XUV700 वर ग्राहकांना दीर्घ प्रतीक्षा वेळ देखील दिला जात आहे. याचे कारण प्रचंड मागणीसह सेमीकंडक्टर चिप्सचा अभाव हे आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की एसयूव्हीच्या AX7 लक्झरी वेरिएंटची प्रतीक्षा आधी 20 ते 22 महिन्यांपर्यंत पोहोचली होती, नंतर कंपनीने ती 18 महिन्यांपर्यंत कमी केली.

सुरुवातीची किंमत 11.99 लाख

अगदी नवीन XUV700 भारतात जोरदार विकली जात आहे आणि कंपनीने त्याची प्रारंभिक एक्स-शोरूम किंमत 11.99 लाख रुपये ठेवली आहे. सध्या, मॉडेल MX, AX3, AX5 आणि AX7 या चार प्रकारांमध्ये ही कार विकली जात आहे. नवीन व्हेरियंटच्या बाह्य भागामध्ये 18-इंच डायमंड-कट अलॉय व्हील, स्मार्ट डोअर हँडल, एलईडी हेडलॅम्प, एलईडी टेललाइट्स, अनुक्रमिक टर्न इंडिकेटर आणि पॅनोरॅमिक सारखे भाग समाविष्ट आहेत.