क्रेडिट, डेबिट कार्ड पेमेंट; बँक-मोबाईल वॉलेटसाठी नवे नियम

Debit card, credit card auto-payment: क्रेडिट, डेबिट कार्ड पेमेंटमध्ये 1 ऑक्टोबरपासून बदल होणार आहे.  

Updated: Sep 22, 2021, 11:24 AM IST
क्रेडिट, डेबिट कार्ड पेमेंट; बँक-मोबाईल वॉलेटसाठी नवे नियम  title=
संग्रहित छाया

मुंबई : Debit card, credit card auto-payment: क्रेडिट, डेबिट कार्ड पेमेंटमध्ये 1 ऑक्टोबरपासून बदल होणार आहे. रिझर्व्ह बॅक ऑफ इंडियाकडून (Reserve Bank of India (RBI) पेमेंट सिस्टीममध्ये मोठे बदल करण्यात येणार आहेत. ऑटो डेबिट पेमेंट सिस्टीम अधिक सुरक्षित करण्यावर भर देण्यात आला आहे. त्यामुळे हे नवे नियम लागू होणार आहेत. (Debit card, credit card auto-payment: RBI new rule on recurring payment from October)

बँक, मोबाईल वॉलेटसाठी नवे नियम

दरम्यान, बँक, मोबाईल वॉलेटसाठी नवे नियम होणार लागू होणार आहेत. वॉलेटमधून पैसे जाण्याआधी ग्राहकांची परवानगी सक्तीची करण्यात आली आहे. (Unified Payments Interface (UPI) यापुढे वॉलेटमधून थेट पैसे जाणार नाहीत, असे धोरण आखले गेले आहे. ग्राहकांच्या परवानगीसाठी वॉलेटला एसएमएस पाठवावा लागणार आहे. त्यानंतर पैसे खात्यातून कट होतील. याचे नवे नियम 1 ऑक्टोबरपासून लागू होणार आहेत.

ऑटो डेबिट पेमेंट सिस्टीम अधिक सुरक्षित

ऑटो डेबिट पेमेंट सिस्टीम अधिक सुरक्षित करण्यासाठी रिझर्व्ह बॅक ऑफ इंडियाने पेमेंट सिस्टीममध्ये मोठे बदल करत आहे. या नव्या नियमांचा बँक आणि मोबाईल वॉलेटवर थेट परिणाम होणार आहे. कारण आता यापुढे  वॉलेटमधून थेट पैसे जाणार नाहीत तर वॉलेटमधून पैसे जाण्याआधी ग्राहकांची परवानगी बंधणकारक असणार आहे. त्यामुळे भविष्यात होणारी फसवणूक टाळण्यास मदत होणार आहे.

पुढील महिन्यापासून, मोबाईल, युटिलिटी आणि इतर बिलांसाठी ऑटो-पेमेंटचे नियम बदलण्याची शक्यता आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) आधी सांगितले होते की, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (यूपीआय) किंवा इतर प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट्स (पीपीआय) वापरून वारंवार होणारे व्यवहार 1 ऑक्टोबरपासून अतिरिक्त फॅक्टर ऑथेंटिकेशनची  (AFA) आवश्यकता असेल. नवीन नियमांनुसार, बँकांना ग्राहकांना आवर्ती देयकाबद्दल आगाऊ माहिती देणे आवश्यक असेल आणि ग्राहकांकडून होकार मिळाल्यानंतर व्यवहार केले जातील. या नियमाचा नेटफ्लिक्स, Amazon प्राइम, डिस्ने+ हॉटस्टारसह विविध स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मसाठी तुमच्या मासिक सदस्यता शुल्कावर परिणाम होण्याची शक्यता आहे.