संरक्षण मंत्री आणि तिन्ही दलाच्या प्रमुखांची रोज होणार बैठक

संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी संरक्षणमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर आता त्या तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत दररोज सकाळी बैठक घेणार आहेत. देशाच्या संरक्षणाच्यादृष्टीने महत्वाच्या बाबींवर जलदगतीने निर्णय व्हावेत, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

Updated: Sep 12, 2017, 05:15 PM IST
संरक्षण मंत्री आणि तिन्ही दलाच्या प्रमुखांची रोज होणार बैठक title=

नवी दिल्ली : संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी संरक्षणमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर आता त्या तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत दररोज सकाळी बैठक घेणार आहेत. देशाच्या संरक्षणाच्यादृष्टीने महत्वाच्या बाबींवर जलदगतीने निर्णय व्हावेत, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

संरक्षण सामुग्रीच्या खरेदीसंबंधी निर्णय घेणारी सर्वोच्च संस्था असलेल्या संरक्षण अधिग्रहण परिषदेची देखील आता प्रत्येक १५ दिवसांनंतर एकदा बैठक होणार आहे. यामुळे संरक्षणाच्यादृष्टीने महत्वाच्या प्रस्तावांना वेळेवर मंजुरी देता येणार आहे. संरक्षण सचिवांसोबतही दररोज वेगळी बैठक संरक्षणमंत्री घेणार आहेत.

सीतारामन यांनी सोमवारी संरक्षण मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. यावेळी अनेक महत्वपूर्ण मुद्द्यांवर संबंधित विभागांना स्पष्ट निर्देश देण्यात आले.