'मला फ्लॅट स्क्रीन टीव्ही म्हणायचे,' अनन्या पांडेने सांगितला धक्कादायक अनुभव, 'माझं शरीर...'

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेने (Ananya Panday) शाळेमध्ये चिडवल्याने आपल्या शरीराबद्दल वाटणारी असुरक्षितता आणि अभिनय करताना सौंदर्याप्रती असणारी मानकं यांचा दबाव यावर भाष्य केलं आहे.   

शिवराज यादव | Updated: Jan 7, 2025, 08:01 PM IST
'मला फ्लॅट स्क्रीन टीव्ही म्हणायचे,' अनन्या पांडेने सांगितला धक्कादायक अनुभव, 'माझं शरीर...' title=

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेला (Ananya Panday) अद्याप मनोरंजनसृष्टीत अपेक्षित यश मिळालेलं नाही. मात्र गतवर्षी प्रदर्शित झालेल्या  CTRL आणि Call Me Bae यामधील तिच्या अभिनयाचं कौतुक करण्यात आलं. दरम्यान नुकतंच फोर्ब्स इंडियाला दिलेल्या मुलाखतीत तिने शाळेमध्ये आपली 'कुबडी' उल्लेख करत हिणवणं आणि एक अभिनेत्री म्हणून सौंदर्य राखण्यासाठी असणारा दबाव यावर भाष्य केलं आहे. 

काही सौंदर्य मानके राखण्यासाठी अभिनेत्यांवरील दबाव आणि ते कसे बदलले जाऊ शकते याबद्दल विचारण्यात आलं असता, अनन्या पांडेने ती लहानपणापासूनच तिच्या शरीराबद्दल कशी असुरक्षित होती याची आठवण सांगितली. ती म्हणाली की, "मी माझ्या शरीराबद्दल फार समाधानी आहे आणि सौंदर्याच्या व्याखेत अगदी योग्य बसते असं वाटू शकतं. पण मी लहान असल्यापासून इतकं ऐकलं की, मीदेखील माझ्या शरिराबद्दल असुरक्षित आहे. जेव्हा मी शाळेत होते तेव्हा लोक म्हणायचे, 'अरे तू तर कुबडी आहेस, तुझे पाय टूथपिकप्रमाणे आहेत, तू फ्लॅट स्क्रीन टीव्ही आहेस', मी तर तुझ्या हातावर किती केस आहेत? अशा गोष्टीही ऐकल्या आहेत. जेव्हा तुम्ही लहान असता तेव्हा लोकांचे हे शब्द तुमच्यावर फार परिणाम करतात. आश्चर्याची बाब म्हणजे, मला आजही 112 वर्षांनी मला कोण आणि नेमकं काय बोलले होते हे आठवतं. यावरुन शब्द तुमच्यासह किती वर्ष राहू शकतात हे दिसतं".

पुढे बोलताना तिने हा दबाव कशाप्रकारे बदलला जाऊ शकतो याबद्दल सांगितलं. "मला वाटतं, एक अभिनेता या नात्याने मी माझे इतर दिवसही असतात यावर भाष्य करु शकते. मी त्यावर काम करते आणि रोज जीमला जाते. जर ते शक्य नाही, तर मी दुसरा मार्ग शोधते. मी दुबईत असताना जरा जास्त जेवले होते. त्यानंतर मला स्कर्ट बसत नव्हता, पण त्यात इतकं काही मोठं नाही. याबद्दल बोलल्याने लोकांना आम्ही परफेक्ट नाही हेदेखील दिसेल. जसं आम्ही दिसत आहोत त्यासाठी फार मेहनत घ्यावी लागते".

कामाबद्दल बोलायचं गेल्यास अनन्या पांडे करण जोहरच्या रोमँटिक ड्रामा 'चांद मेरा दिल'मध्ये लक्ष्यसोबत दिसणार आहे. विवेक सोनी दिग्दर्शित, हा चित्रपट 2025 मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. अधिकृत रिलीजची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. याशिवाय तिच्याकडे भारतीय वकील आणि राजकारणी सी शंकरन नायर यांच्यावर आधारित धर्मा प्रॉडक्शनचा चित्रपट देखील आहे, ज्यामध्ये ती अक्षय कुमार आणि आर. माधवन यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे.