राहुल गांधींना अध्यक्ष करण्यासाठी दिल्ली काँग्रेसने पास केला प्रस्ताव

दिल्ली प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अनिल चौधरी यांनी याबाबत माहिती दिली.

Updated: Aug 23, 2020, 10:43 PM IST
राहुल गांधींना अध्यक्ष करण्यासाठी दिल्ली काँग्रेसने पास केला प्रस्ताव title=

नवी दिल्ली : सोमवारी काँग्रेस कार्यकारिणी समितीच्या (सीडब्ल्यूसी) बैठकीपूर्वी दिल्ली प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अनिल चौधरी यांनी रविवारी म्हटलं की, पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्षाची सूत्रे स्वीकारली पाहिजेत. इतकेच नव्हे तर दिल्ली काँग्रेसने राहुल गांधी यांना काँग्रेस अध्यक्ष बनविण्याचा ठरावही संमत केला आहे. या प्रस्तावाच्या माध्यमातून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे पक्ष नेतृत्वाबद्दल आभार मानण्यात आले. कोरोनाच्या काळात सोनिया गांधी यांच्या मार्गदर्शनाखालीच काँग्रेसचे कार्यकर्ते लोकांमध्ये गेले आणि जनतेची मदत केली, असे  ठरावात म्हटले आहे.

प्रदेशाध्यक्ष अनिल चौधरी यांच्या नेतृत्वात दिल्ली प्रदेश काँग्रेस कमिटी कार्यालयात आपत्कालीन बैठक बोलविण्यात आली होती, ज्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार, माजी आमदार, जिल्हाध्यक्ष, नगरसेवक, ब्लॉक अध्यक्ष, माजी नगरसेवकांसह सर्व काँग्रेस कार्यकर्ते एकत्र आले होते. काँग्रेस कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाला युवा नेतृत्व देण्यासाठी राहुल गांधींना अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बनवावे अशी मागणी केली आहे.

दिल्ली काँग्रेस अध्यक्ष म्हणाले की, राहुल गांधी यांना काँग्रेसचे अध्यक्ष बनविण्याच्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या प्रस्तावाचं मी समर्थन करतो. त्यांच्या प्रभावी नेतृत्वात, काँग्रेस भाजप आणि मोदी सरकारच्या खोट्या अजेंडाचा पर्दाफाश करेल ज्यांनी लोकांना उलट दिशेने नेले आहे. ज्याने देशाला मोदी सरकारच्या अधीन नेले आहे.

या ठरावामध्ये काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे आभार व्यक्त करताना त्यांनी म्हटले की, 'त्यांनी कार्यक्षमतेने पक्षाचे नेतृत्व केले, आणि कार्यकर्त्यांना कठीण व संघर्षाच्या परिस्थितीत प्रेरित केले. त्यांच्या उल्लेखनीय कार्य आणि मार्गदर्शनाखालीच कोरोनाच्या काळात काँग्रेसचे कार्यकर्ते आणि नेत्यांनी देशातील सद्य समस्या सोडविण्यासाठी लोकांमध्ये जावून काम केले. पीडित जनतेच्या हितासाठी कोणतेही काम भाजप सरकार आणि केंद्रातील त्यांच्या नेत्यांनी केले नाही, ज्यात लाखो प्रवासी कामगारांचा समावेश आहे. ज्यांना शहर सोडून आपल्या गावी परत जावे लागले.'

'अभिव्यक्ती स्वातंत्र्यांच्या खाली काँग्रेसच्या काही वरिष्ठ नेत्यांनी नेतृत्व बदलाबद्दल केलेले वक्तव्य योग्य नव्हते. कारण यामुळे विरोधकांना  टीका करण्यासाठी हत्यार मिळालं आणि पक्षातील कार्यकर्त्यांचं खच्चीकरण झालं. हा मुद्दा पक्षाच्या मंचावर मांडण्याऐवजी मीडियामध्ये लिक केला गेला.' असं ही त्यांनी म्हटलं.