Delhi Metro मध्ये पोरानं केली करामत; असं काही केलं की.. कानावर विश्वासच बसेना, पाहा Video

Delhi Metro Announcements Video: मागील काही दिवसांपासून दिल्ली मेट्रोमधील विविध व्हिडिओ समोर आले आहेत. अशातच आता इन्टाग्रामवर (Instagram) सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक तरुण मुलगा मिमिक्री (Mimicry video) करताना दिसतोय. 

Updated: May 17, 2023, 04:24 PM IST
Delhi Metro मध्ये पोरानं केली करामत; असं काही केलं की.. कानावर विश्वासच बसेना, पाहा Video title=
Delhi Metro,Viral Video

Delhi Metro Viral Video: गेल्या अनेक वर्षात दिल्लीला अनोखी ओळख मिळालीये ती मेट्रोमुळे. मेट्रो (Delhi Metro) सध्या दिल्लीसाठी लाईफलाईन झाली आहे. शम्मी नारंग आणि रिनी सायमन खन्ना यांचा सुमधूर आवाज आजही दिल्लीच्या मेट्रोमध्ये अनेकांना कानी पडतो. 'दरवाजे बाईं ओर खुलेंगे' तसेच 'अगला स्टेशन है...' या आवाजांचे श्रृतिक म्हणजे शम्मी नारंग आणि रिनी सायमन खन्ना. यांचा आवाज म्हणजे खुपच युनिक. या आवाजाची नक्कल करणं म्हणजे जवळजवळ अशक्यच असतं. अशातच दिल्ली मेट्रोमधील एक व्हिडिओ (Viral Video) समोर आला आहे.

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर मागील काही दिवसांपासून दिल्ली मेट्रोमधील विविध व्हिडिओ समोर आले आहेत. अशातच आता इन्टाग्रामवर (Instagram) सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक तरुण मुलगा मिमिक्री करताना दिसतोय. व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या या तरुणाचं नाव कृष्णांश शर्मा (Krishnansh Sharma) असल्याचं सांगितलं जातंय. तो एक अभिनेता आणि पॉडकास्टर आहे. त्याचा व्हिडिओ (Delhi Metro Announcement Mimicry) पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलंय.

सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ whokrishnansh या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. माझ्या शेवटच्या रीलला मिळालेला अप्रतिम प्रतिसाद पाहून मी आणखी एक बनवण्याचा निर्णय घेतला, असं शेअर करणाऱ्याने म्हटलं आहे. शम्मी नारंग यांच्या आवाजाचा बेस खुप जास्त असतो, त्यामुळे त्यांच्या आवाजाची नक्कल करणं येड्या गबाळ्याचं काम नाही, अशातच कृष्णांशचा व्हिडिओ व्हायरल ( Man Perfectly Mimics Delhi Metro Announcements) होत आहे.

पाहा Video

दरम्यान, दिल्लीच्या मेट्रोमधील काही व्हिडिओ मागील काही दिवसात चर्चेच्या केंद्रस्थानी होते. अशातच नवा व्हिडिओ (Delhi Metro Funny Video) समोर आलाय. दिल्ली मेट्रो कपलसाठी अश्लील चाळे करण्याचा अड्डा झालाय, त्यामुळे आता दिल्ली पोलीस गस्त घालणार असण्याचं सांगण्यात आलंय.  डीएमआरसीने याप्रकरणी कारवाई करण्यासाठी दिल्ली पोलिसांना पत्र लिहिलं होतं. त्यानंतर दिल्ली पोलीस (Delhi Police) अॅक्शन मोडवर आली आहे.