Delhi Murder Case: डेटा केबलने गळा आवळला अन् नंतर.., निक्की यादवच्या हत्येचं CCTV आलं समोर

Delhi Murder Case: राजधानी दिल्ली पुन्हा एकदा हत्याकांडाने (Delhi Murder) हादरली असून त्याचं सीसीटीव्ही (CCTV) समोर आलं आहे. लिव्ह-इन मध्ये राहत असलेल्या प्रियकरानेच आपल्या प्रेयसीची डेटा केबलच्या सहाय्याने गळा दाबून हत्या केली आणि नंतर मृतदेह फ्रीजमध्ये लपवला होता.   

Updated: Feb 15, 2023, 05:48 PM IST
Delhi Murder Case: डेटा केबलने गळा आवळला अन् नंतर.., निक्की यादवच्या हत्येचं CCTV आलं समोर title=

Delhi Murder Case: राजधानी दिल्ली पुन्हा एकदा हत्याकांडाने (Delhi Murder) हादरली असून पोलीस आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. प्रियकरानेच आपल्या प्रेयसीची वायरने गळा दाबून हत्या केली आणि नंतर मृतदेह फ्रीजमध्ये लपवला होता. पोलीस या प्रकरणाची अजून चौकशी करत आहेत. दरम्यान हत्या करण्यात आलेल्या निक्की यादवचं (Nikki Yadav) सीसीटीव्ही (CCTV) फुटेज समोर आलं आहे. हत्येच्या काही तासांच्या आधीच्या या सीसीटीव्हीत निक्की स्पष्टपणे दिसत आहे. 

निक्की यादवची तिचाच प्रियकर साहिल गेहलोत (Sahil Gehlot) याने गळा दाबून हत्या केली आहे. दरम्यान, निक्की यादव इमारतीमधील सीसीटीव्हीत कैद झाली असून, यामध्ये ती पायऱ्या चढताना दिसत आहे. याच इमारतीत साहिल आणि निक्की लिव्ह-इनमध्ये राहत होते. हे सीसीटीव्ही 9 फेब्रुवारीचं आहे. 

धक्कादायक बाब म्हणजे आरोपी साहिल गेहलोत याने हत्या केल्यानंतर त्याच दिवशी दुसऱ्या महिलेशी लग्न केलं होतं. पोलिसांनी 14 फेब्रुवारीला साहिलला ताब्यात घेतलं. दिल्ली कोर्टाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. 

मुख्य न्यायादंडाधिकारी अर्चना बेनिवाल यांनी दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेला आरोपीची चौकशी करण्यासाठी आणि नेमकी हत्या कशी झाली तसंच कथित गुन्हा केल्यानंतर त्याने कोणत्या मार्गाने प्रवास केला हे तपासण्यासाठी त्याला पाच दिवसांची कोठडी दिली आहे. पोलिसांना पीडितेचा मृतदेह सापडला आहे. 

प्राथमिक तपासात दिल्ली पोलिसांना माहिती मिळाली आहे की, निक्की यादव साहिलसह लिव्ह-इनमध्ये राहत होती. यादरम्यान साहिलचं लग्न ठरलं होतं. त्याने ही गोष्ट निक्कीपासून लपवली होती. यावरुन 9 आणि 10 फेब्रुवारीच्या रात्री निक्की आणि साहिलमध्ये भांडण झालं. याचवेळी साहिलने निक्कीची मोबाइल फोनची डेटा केबल वापरुन हत्या केली. यानंतर एका ढाब्यावरील फ्रीजमध्ये हा मृतदेह लपवला होता. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x