कुठे वाढतोय थंडीचा कडाका, कुठे अवकाळीसह गारपिटीचा धोका; ताशी 30-40 किमी वेगानं वारेही वाहणार...

Maharashtra Weather News : राज्यातील हवामानात हा बदल नेमका का झाला? काय आहे या बदलांमागचं मुख्य कारण? जाणून घ्या सविस्तर हवामान वृत्त...   

सायली पाटील | Updated: Dec 24, 2024, 07:16 AM IST
कुठे वाढतोय थंडीचा कडाका, कुठे अवकाळीसह गारपिटीचा धोका; ताशी 30-40 किमी वेगानं वारेही वाहणार... title=
Maharashtra Weather News hailstorm and rain predoictions in state latest climate report and citywise temprature

Maharashtra Weather News : देशाच्या उत्तरेकडील सीमेपलीकडून येणाऱ्या शीतलहरींचा वेग काहीसा मंदावला असून, उत्तरी पर्वतीय क्षेत्रामध्येही गारठा कमी झाल्याचं लक्षात येत आहे. हिमाचल प्रदेश, काश्मीर, उत्तराखंड या भागांमध्ये सध्या डोंगराळ क्षेत्र वगळता मैदानी भागामध्ये किमान तापमानाच वाढ झाली असून या राज्यांकडून येणाऱ्या वाऱ्यांचा वेग आणि प्रभाव मंदावल्यामुळं महाराष्ट्रापर्यंत त्याचे परिणाम दिसून येत आहेत. 

हवामान विभागाच्या माहितीनुसार उत्तरेकडे थंडीचा कडाका कमी झाल्यामुळं राज्यातही किमान आणि कमाल तापमानात मोठा फरक पाहायला मिळत आहे. तर, बंगालच्या उपसागरातील पूर्वमध्य क्षेत्रामध्ये कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्यामुळं देशाच्या दक्षिण किनारपट्टी भागामध्ये सध्या पावसासाठी पूरक वातावरणनिर्मिती होत असून, महाराष्ट्रातही त्याचा कमीजास्त परिणाम दिसून येत आहे. 

हेसुद्धा वाचा : महाराष्ट्रातून सुटलेल्या वंदे भारत एक्सप्रेसचा मार्ग भरकटला; गोव्याला निघालेली ट्रेन पनवेल ऐवजी कल्याणच्या दिशेला गेली आणि...

 

राज्यात धुळ्यापासून निफाडपर्यंत बहुतांश भागांमध्ये किमान तापमानात वाढ झाली असून, बोचरी थंडी काहीशी माघार घेताना दिसत आहे. तर, विदर्भावर पावसाचे ढग घोंगावत असून इथं तुरळक सरींचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यात ऐन हिवाळ्यात वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज वर्तवण्यात आल्यामुळं आता शेतकरी चिंतेत आला आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भासह मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या पावसाचा फटका शेतपिकाला बसणार आहे. 

ताशी 30 ते 40 किमी वेगानं वारे वाहणार 

पुढील 48 तासांमध्ये राज्यात थंडीका कडाका कमी राहणार असला तरीही आठवड्याचा शेवट मात्र गारठ्यानंच होणार आहे. दक्षिणेकडे सक्रिय असणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळ वाहणारे बाष्पयुक्त वारे आणि उत्तरेकडून येणारे थंड वारे यामुळं महाराष्ट्राला वादली पावसाचा तडाखा बसणार असून, यादरम्यान ताशी 30 ते 40 किमी वेगानं वारेही वाहणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. संपूर्ण महाराष्ट्रासमवेत मुंबई शहर आणि उपनगरांमध्येही हवामानाची अशीच स्थिती कायम राहणार असून, ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे. 

कुठे देण्यात आलाय गारपीटीचा इशारा? - जळगाव, नाशिक, धुळे नंदुरबार