ईयरफोन लावून झोपलेल्या तरुणाचा करंट लागून मृत्यू

कानात ईयरफोन लावून झोपला असताना त्याच्या मोबाईल चार्जिंगला होता.

Updated: Feb 8, 2019, 01:44 PM IST
ईयरफोन लावून झोपलेल्या तरुणाचा करंट लागून मृत्यू  title=

नवी दिल्ली : मोबाईल ही काळाची गरज झाली असली तरी त्यामुळे अनेक जीव धोक्यात असल्याचे धक्कादायक प्रकार समोर येत असतात. मोबाईल सारखे तंत्रज्ञान हाताळण्याच्या पद्धती, घेण्याची काळजी याकडे दुर्लक्ष केल्यावर अशा दुर्देवी घटना घडत असतात. नवी दिल्लीतील एका तरुणाचा ही अशाच प्रकार दुर्देवी मृत्यू झाला आहे. क्रिटसाडा सुपोल असे या मृत तरुणाचे नाव आहे. कानात ईयरफोन लावून झोपलेल्याने क्रिटसाडाला आपला जीव गमवावा लागला. पोलीस याप्रकरणी अधिक चौकशी करीत आहेत. कानात ईयरफोन लावून झोपला असताना त्याच्या मोबाईल चार्जिंगला होता असे प्रथमदर्शनी अहवालातून समोर येत आहे. 

विजेच्या करंट लागल्याने क्रिटसाडाचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन अहवालासाठी पाठवला आहे. हा अहवाल आल्यानंतर या मृत्यूविषयी अधिक माहीती मिळू शकणार आहे. या मृत्यूनंतर स्वस्तातला चार्जरबाबत पोलिसांनी एक पत्रक जारी केले. घरमालक जेव्हा क्रिटसाडाच्या घरी पोहोचला तेव्हा त्याला तो मृतावस्थेत आढळला. यासंदर्भात त्याने पोलिसांना तात्काळ माहीती दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा मृतकाच्या कानात ईयरफोन होता आणि माईकवर त्याचे ओठ होते. याचा अर्थ तो कोणाशी तर बोलत होता अथवा गाणी ऐकत होता. 

Image result for death zee

हा मृत्यू करंट लागून झाल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी प्राथमिक अहवालात सांगितले. स्वस्तातला चार्जर हा त्याच्या मृत्यूचे कारण बनल्याचेही पोलिसांनी यावेळी स्पष्ट केले. ज्या व्यक्ती स्वस्तातला चार्जर वापरतात किंवा जे चार्जर कोणत्या अधिकृत कंपनीद्वारे बनवलेले नसतात त्यांच्या जीवाला धोका असल्याचेही पोलिसांनी यावेळी स्पष्ट केले. 

मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून त्यातून नेमके कारण कळणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. मोबाईल चार्जर्सना जे इनपुट मिळते ते 240 वोल्टचे असते तर आऊटपुट 5 वोल्टचे असते. पण स्वस्तातल्या चार्जरमध्ये 240चा करंटच आऊटपुट केबलमध्ये पाठवला जातो. गेल्यावर्षी ब्राझीलमध्ये अशाप्रकारे एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला होता.