कोरोनामुळे राजस्थानमध्ये 100 रुपये किलोने विकलं जातंय मीठ, खरेदीसाठी रांगा

कोरोनाचा संसर्ग वाढत असताना मीठाची मागणी वाढली. काय आहे यामागचं कारण... वाचा

Updated: May 20, 2021, 06:27 PM IST
कोरोनामुळे राजस्थानमध्ये 100 रुपये किलोने विकलं जातंय मीठ, खरेदीसाठी रांगा title=

जयपूर : राजस्थानमध्ये कोरोना विषाणूनंतर काळ्या बुरशीचं संकट उभं राहिलं आहे. प्रशासन आणि राज्य सरकारपुढे यामुळे चिंता वाढल्या आहेत. पण यामुळे राज्यात मीठाचे दर झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे 18 ते 20 रुपयांना मिळणारे एक किलो मीठ आता 100 रुपयांना विकले जात आहे.

अंत्यसंस्कारासाठी मीठाचा वापर

वास्तविक, अफवा पसरली आहे की ओआरएस प्रमाणे मिठाचे पाणी पिण्यामुळे कोरोनाचा संसर्ग होत नाही. तसेच, जर विषाणूमुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तीवर मीठ टाकून अंत्यसंस्कार केले तर ते संक्रमण पसरणार नाही. ही अफवा राज्यातील अनेक गावात मोठ्या प्रमाणात पसरली आहे.

'मीठामुळे प्रतिकारशक्ती वाढत असल्याचा दावा

बर्‍याच खेड्यांमधील लोक म्हणतात की मीठ वापरल्याने प्रतिकारशक्ती वाढते. ओआरएस प्रमाणेच मीठाचे पाणी प्यायल्याने देखील कोरोना होत नाही अशी अफवा पसरली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात मिठासाठी लाईन लागली असून ते 100 किलोने विकले जात आहे.

एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात गावात कोरोनाचा संसर्ग पसरलेला नाही. परंतु महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात, जेव्हा शहरांमध्ये मृत्यू वाढू लागले, तेव्हा मृतदेह खेड्यापाड्यांकडे पाठविण्यास सुरवात झाली. मृतदेह पीपीई किटमध्ये किंवा प्लास्टिकमध्ये ठेवण्यात आले होते. पण जेव्हा मृतदेह खेड्यांमध्ये अंत्यसंस्कारासाठी बाहेर काढले जात असता तेव्हा पीपीई किट आणि प्लास्टिक फाडून टाकले गेले असते. ज्यामुळे गावात संसर्ग झपाट्याने पसरू लागला. 

कोविड प्रोटेकोल अंतर्गत अंत्यसंस्कार केले गेले नाहीत. याच दरम्यान ग्रामीण भागात एक विचित्र अफवा पसरली की मृत व्यक्तीचे अंत्यसंस्कार मीठाने केले तर कोरोना पसरत नाही. यामुळे लोकांमध्ये मीठ खरेदी करण्याची स्पर्धा सुरु झाली आणि त्याचे दर वाढले.

कोरोना काळात अनेक अफवा या सोशल मीडियावर पसरत आहेत. अशीच एक अफवा सध्या राजस्थानमध्ये देखील पसरली आहे. ज्यामुळे मीठाची मागणी वाढली आणि 20 रुपयांना मिळणार मीठ 100 रुपयांना विकलं जात आहे.