आईचा लेकरासाठी देशी जुगाड; तुमच्या कारमध्येही हे सुख मिळणार नाही, पाहा व्हिडीओ

पोटच्या पोरासाठी आईने केला देसी जुगाड....

Updated: Sep 29, 2022, 04:55 PM IST
आईचा लेकरासाठी देशी जुगाड; तुमच्या कारमध्येही हे सुख मिळणार नाही, पाहा व्हिडीओ title=

Trending Video : माणसाची गरज ही संशोधनाची जननी असते, हे इतिहासापासून शिकायला मिळतं. सोशल मीडियाच्या (Social Media viral Video) जन्मापासून अनेक वेगवेगळे व्हिडीओ पहायला मिळतात. काही व्हिडीओ मनात घर देखील करून जातात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेला दिसत आहे. (Desi jugaad Mother made a innovative backseat on bicycle using kids chair)

व्हायरल झालेला हा व्हिडीओ प्रसिद्ध उद्योगपती हर्ष गोएंका (Harsh Goenka) यांनी ट्विटरवर शेअर केलाय. व्हिडिओमध्ये, एक आई रस्त्यावर सायकल चालवताना दिसत आहे, परंतू या व्हिडीओतील खास गोष्ट म्हणजे आईने मुलासाठी बनवलेले नाविन्यपूर्ण बॅकसीट..., आईने (Desi jugaad of indian Mother) देशी जुगाड करत आपल्या चिमुकल्यासाठी बॅकसीट तयार केली.

बापरे! पठ्ठ्याची हिंमत तर बघा, विजेच्या तारेला बनवला 'झोका'; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

आईने आपल्या पोटच्या लेकरासाठी एक सायकलच्या कॅरियरला एक छोटी खुर्ची बांधली (Innovative backseat on bicycle). त्यामुळे तिच्या बाळाला आरामात प्रवास करता आला. दोन्ही माय लेकरू आरामात प्रवास करताना दिसून येत आहेत. फक्त 9 सेकंदाचा हा व्हिडीओ (Trending Video) अनेकांना आवडला देखील आहे. आईने केले्ल्या जुगाडामुळे बाळाला आरामात (kids chair) राजकुमारासारखं फिरता आलं.

पाहा व्हिडीओ-

दरम्यान, व्हायरल झालेला गोएंका हर्ष गोयंका यांना खूप आवडला. एक आई आपल्या लेकरासाठी काय काय नाही करत!, असं म्हणत गोएंका यांनी कौतूक केलं. या व्हिडीओला तब्बल 1.5 मिलीयन लोकांनी पाहिला आहे. तर अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट देखील केल्या आहे.