मुंबई : धनत्रयोदशी ही देशभरातील व्यवसायिक आस्थापनांसाठी एक सुवर्णसंधी असल्याचे सिद्ध झाले आहे. कोरोना कालावधीत नकारात्मकतेने ग्रस्त असलेल्या लोकांना धनत्रयोदशी साजरा करण्याची संधी मिळाली. मोठ्या संख्येने लोक बाजारात गेले आणि जोरदार खरेदी केली. धनत्रयोदशीला खेड्यांमध्ये, गावे आणि लहान-मोठ्या शहरांमध्ये चांगला व्यवसाय झाला. व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की, आगामी विवाहसोहळा चांगला होईल अशी अपेक्षा आहे आणि यामुळे बहुतांश क्षेत्रातील व्यवसाय वर येतील.
बाजाराची चमक या धनत्रयोदशीला परत आली आहे. देशभरातील दागिन्यांच्या बाजारातील चमक ६ महिन्यांनंतर परत आली आहे. धनत्रयोदशीला लोकांनी मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी केले. त्यामुळे येत्या लग्नाच्या मोसमात चांगला व्यवसाय होण्याची आशा व्यापाऱ्यांमध्ये वाढली आहे. न्यूज एजन्सी एएनआयने दिल्लीतील ज्वेलरचा हवाला देत म्हटले आहे की, 'लॉकडाऊननंतर किरकोळ दुकानात लोक येण्याचे टाळत होते, पण आता परिस्थिती सामान्य झाली आहे.' ८० टक्के व्यवसाय परत आला आहे. सध्याच्या कोरोना विषाणूच्या साथीच्या काळात लोकांच्या जीवनात बरीच नकारात्मकता होती, दिवाळीच्या निमित्ताने ती कमी होण्यास मदत होणार आहे.
मार्च-एप्रिलमध्ये अनेकांचे लग्न पुढे ढकलले गेले. जे आता सुरु झाले आहेत. इतर खर्च कमी झाल्यामुळे लोकं दागिन्यांवर अधिक खर्च करीत आहेत. लग्नाच्या हंगामात बाजारपेठ मागील वर्षापेक्षा चांगला व्यवसाय करेल असा व्यापाऱ्यांना विश्वास आहे.
धनत्रयोदशीला राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील बाजारपेठेतही चांगले वातावरण होते. दिल्ली व्यापार महासंघाचे अध्यक्ष देवराज बावेजा म्हणाले की, धनत्रयोदशीला खरेदीबाबत लोकांमध्ये चांगला उत्साह दिसला. भांडी आणि गिफ्ट वस्तूंच्या दुकानांमध्ये सर्वाधिक गर्दी असल्याचे त्यांनी सांगितले. धनत्रयोदशीला व्यवसाय चांगला झाला आहे, परंतु लोकांमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या भीतीमुळे मागील वर्षाच्या तुलनेत फारसा व्यवसाय झाला नाही.
उद्योग समिती पीएचडीचे अध्यक्ष संदीप अग्रवाल म्हणाले की, 'दिवाळीच्या काळात विशेषत: धनत्रयोदशीला गावं आणि शहरांमध्ये चांगला व्यवसाय झाला आहे. स्वस्त वस्तूंची विक्री होत आहे. कृषी क्षेत्रात चांगली वाढ झाली आहे. डायमंड ज्वेलरी, महागड्या एसीसारख्या महागड्या उत्पादनांची मागणी कमी होती.
एफआयसीसीआयच्या अध्यक्ष डॉ. संगीता रेड्डी म्हणाल्या की, बाजारात अनेक सकारात्मक चिन्हे आहेत आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेत वेगवान पुनर्प्राप्ती दिसून येत आहे. अर्थमंत्र्यांनी देशाला दिवाळीची मोठी भेट दिली आहे, ज्यामुळे रोजगार आणि निर्यातीत वाढ होईल. हे भारताला जागतिक मूल्य साखळीचा एक भाग बनवेल.