Diwali 2022: video 'या' दिवाळीसाठी नेसा ट्रेंडी साडी; खास टिप्स वापरून मिळवा हटके लूक

प्लेट्स व्यवस्थित पिन करा. पल्लू खांद्याच्या अगदी वर आणि

Updated: Oct 18, 2022, 02:09 PM IST
Diwali 2022: video 'या' दिवाळीसाठी नेसा ट्रेंडी साडी; खास टिप्स वापरून मिळवा हटके लूक title=

Diwali 2022: दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यासाठी साधारण महिन्याभरापासूनच बाजारपेठा सजल्या आहेत. आता घराघरामध्ये फराळाची (Diwali Faral) तयारी शेवटच्या टप्प्यात आली आहे. साडी आणि महिलांचं एक वेगळं खास नातं आहे , सणासुदीच्या काळात महिलांना नटायला खूप आवडत त्यात साडी नेसणं हे तर आलच. महिलांना पारंपरिक लूकमध्ये तयार व्हायला खूप आवडत. वेगळ्या लूकसाठी पारंपरिक साडी नसण्यापेक्षा वेगळा प्रयत्न करून साडी नसलात तर तुम्हाला हटके लुक येऊ शकतो. चला तर मग या दिवाळीत ट्राय करा या टिप्स आणि दिसा सर्वात हटके आणि सुंदर. (saree draping in minutes)

हे वाचा: Diwali 2022: स्किनटोन नुसार लावा नेलपेंट. या दिवाळीत प्लॉन्ट करा सुंदर नखं

राजस्थानी साडी लुक यावेळी तुम्ही try करा. (saree drapping tips)

पण जर तुम्ही राजस्थानी स्टाईलमध्ये किंवा फ्रंट पल्लू ड्रेप करत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. 

हे वाचा:या दिवाळीत अशी करा स्वच्छता..सोप्या घरगुती उपायांनी चमकवा वस्तू 

प्लेट्सची काळजी घ्या

जेव्हा तुम्ही समोरच्या पल्लूसह साडी नेसता तेव्हा पल्लूच्या प्लेट्सची विशेष काळजी घ्या. प्लेट्स बनवताना, सर्व प्लेट्स सारखेच असतील असा प्रयत्न करा. तरच पल्लू छान दिसेल. तसेच प्लेट्स व्यवस्थित पिन करा. पल्लू खांद्याच्या अगदी वर आणि खाली पिन करून बसवा

ब्लाउजचं सिलेक्शन आहे महत्वाचं (trending fancy blouse design ideas)

साडीसोबतच समोरच्या पल्लूमध्ये ब्लाउजही खास असावा. जेणेकरून सर्वांचं लक्ष ब्लाउजकडे जाईल. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही क्रॉप टॉपला समोरच्या पल्लूसोबतही मॅच करू शकता. ते खूप सुंदर दिसेल.

हे वाचा: दिवाळीच्या आधी अशी करा देवघराची साफसफाई..देवांच्या मूर्ती मिनिटात चमकतील..

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Dolly Jain (@dolly.jain)

बेल्टने स्टाईल करा (belt on saree)
तुम्हाला तुमचा पुढचा पल्लू खास आणि स्टायलिश बनवायचा असेल तर बेल्टने सेट करा. प्लीट्स व्यवस्थित पिन करा आणि बेल्ट एकत्र ठेवा. हे खूप छान लुक देईल.

पल्लू अधिक खास बनवण्यासाठी तुम्ही अॅक्सेसरीजवरही लक्ष केंद्रित करू शकता.  साडीवर हेवी  एम्ब्रॉयडरी आणि बॉर्डर  असेल तर तुम्ही हेवी कानातले किंवा चांदबली घालू शकता. (heavy earrings)