द्रमुकचे प्रमुख एमके स्टालिन तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताचं पत्नीच्या डोळ्यात अश्रू

द्रमुकचे प्रमुख एमके स्टालिन तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

Updated: May 7, 2021, 06:29 PM IST
द्रमुकचे प्रमुख एमके स्टालिन तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताचं पत्नीच्या डोळ्यात अश्रू title=

मुंबई : द्रमुकचे प्रमुख एमके स्टालिन तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शुक्रवारी त्यांनी चेन्नईच्या राजभवनात राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी स्टालिन यांना शपथ दिली. शपथविधी सोहळ्यात त्यांची पत्नी दुर्गा स्टालिन देखील  राजभवनात उपस्थित होत्या. एमके स्टालिन यांनी तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताचं त्यांच्या पत्नीच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. सोशल मीडियावर त्यांचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओ अत्यंत भावूक आहे. 

महत्त्वाचं म्हणजे यावेळी एमके  स्टालिन यांच्या शिवाय मंत्रीमंडळातील अन्य 33 मंत्र्यांनीही शपथ घेतली.  एमके  स्टालिन यांच्याकडे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री पदाची देखील जबाबदारी दिली असल्याचं सांगण्यात येत आहे. यावेळी  स्टालिन यांनी जमलेल्यांच्या आनंदासाठी स्वतः पूर्ण नाव मुथुवेल करुणानिधी स्टालिन असं वाचलं. 

त्यांनी स्वतःचं पूर्ण नाव घेताचं टाळ्यांचा कडकडाट ऐकू आला. संपूर्ण आनंदाचा माहोल पाहाताचं त्यांची पत्नी दुर्गा स्टालिन आणि मुलगा उधयनिधी स्टालिन रडू लागले. त्यांच्या पत्नीचा एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अत्यंत भावूक करणारा हा व्हीडिओ आहे. 

ट्विटरवर हा व्हीडिओ Mohamed Imranullah नावाच्या यूजरने पोस्ट केला आहे. व्हीडिओ पोस्ट करत त्यांनी एक उत्तम कॅप्शन देखील दिलं आहे. 'प्रत्येक यशस्वी पुरूषाच्या यशामागे एका स्त्रीचा सहभाग असतो.' असं कॅप्शन देत, दुर्गा स्टालिन यांच्या प्रतिक्रिया पाहा असं देखील लिहीलं आहे.