पेनानं लिहिलेल्या नोटा चलनातून बाद होणार? जर तुमच्याकडेही या नोटा असतील तर...!

असा दावा करण्यात येतोय, नव्या नियमानुसार पेनानं लिहिलेली नोट, तसंच फाटलेली नोट चलनातून बाद होते. हा दावा केल्यानं याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे.

Updated: Jan 10, 2023, 10:58 PM IST
पेनानं लिहिलेल्या नोटा चलनातून बाद होणार? जर तुमच्याकडेही या नोटा असतील तर...! title=

Writing on bank note : तुमच्याकडे असलेल्या नोटांवर पेनानं लिहिलं असेल तर ती चालणार नाही. त्या नोटेची किंमत शून्य असेल. मग ती नोट 100 रुपयांची असो नाहीतर 2 हजार रुपयांची...त्या नोटेला काहीच किंमत नाही...असा दावा करणारा मेसेज सध्या व्हायरल होतोय.

नव्या नियमानुसार पेनानं लिहिलेली नोट, तसंच फाटलेली नोट चलनातून बाद होते. हा दावा केल्यानं याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे.

काय आहे व्हायरल मेसेज

आरबीआयच्या नव्या नियमांनुसार, 50, 100, 200, 500, 2000 रुपयांच्या नोटांवर काही लिहिलेलं असेल तर त्या चलनातून बाद असतील. त्या नोटा चालणार नाहीत.

हा मेसेज व्हायरल होत असल्याने आम्ही सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पैसे हा प्रत्येकासाठी महत्त्वाचा विषय आहे. नोटा या एकाकडून दुस-याकडे, दुस-याकडून तिस-याकडे फिरत असतात. अनेकदा आपल्याकडेही फाटलेल्या, लिहिलेल्या नोटा येत असतात. त्यामुळे, या दाव्यात किती तथ्य आहे याची माहिती आम्ही बँकेकडून मिळवली.

काय सत्य समोर आलं पाहूयात

  • व्हायरल होत असलेला मेसेज खोटा आहे
  • पेनानं लिहिलेल्या नोटा चलनातून बाद होत नाहीत
  • स्वच्छ नोट पॉलिसीच्या धोरणांनुसार नोटांवर काही लिहू नये
  • पेनानं लिहिल्याने नोटांचं आयुष्य कमी होतं 
  • खराब, फाटलेल्या नोटा बँकेत बदलून मिळतात

असं असलं तरी नोटांवर लिहू नका. यामुळे नोटेचं आयुष्य कमी होतं. काही दुकानदार अशा नोटा घेत नाहीत. आमच्या पडताळणीत पेनानं लिहिलेल्या नोटा चलनात चालणार नाहीत हा दावा असत्य ठरला.