एक फुलटॉस आणि थेट बाऊंड्री; डॉगीची बॅटिंग पाहिली का?

व्हिडीओ मध्ये कुत्र्यांने तोंडात बॅट धरली आहे. बॅटचा रंग पिवळा आहे. कुत्र्याची नजर मालकाच्या हातात असणाऱ्या बॉलकडे आहे

Updated: May 22, 2022, 09:19 AM IST
एक फुलटॉस आणि थेट बाऊंड्री; डॉगीची बॅटिंग पाहिली का? title=

Dog Batting Viral Video : भारतात क्रिकेटचं वेड अनेकांना आहे. अगदी लहानपणीच मुलांच्या हातात बॅट दिली जाते. लहान मुलं खेळताना पाहून पालक म्हणतात, "माझा मुलगा सचिन तेंडुलकर, विराट कोहली किंवा धोनी होणार". पण तुम्हाला माहित आहे का? प्राण्यांना सुद्धा आता क्रिकेटचं वेड लागलंय. असाच एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होतंय. या व्हिडीओ मध्ये एक कुत्रा बॅटिंग करत आहे. आणि त्याचे शॉटस् देखील अप्रतिम आहे. 
 

डॉगीची अप्रतिम फलंदाजी

या व्हिडीओ मध्ये कुत्र्यांने तोंडात बॅट धरली आहे. बॅटचा रंग पिवळा आहे. कुत्र्याची नजर मालकाच्या हातात असणाऱ्या बॉलकडे आहे. मालकाच्या हातात दोन पिवळ्या रंगाचे बॉल आहेत. मालक आपल्याकडे कधी बॉल फेकतोय याच विचारात कुत्रा आहे. मालक बॉल फेकण्याच्या तयारीत उभा राहतो. कुत्रा सुद्धा बॅटिंग करण्याच्या तयारीत आहे. अखेर मालकाने बॉल फेकला आणि कुत्र्याने या फुलटॉस बॉलला जोरदार फटका दिला. 

बॅट्समन डॉगी जबरदस्त व्हायरल

फुलटॉस बॉलला एखादा बॅट्समन जी दिशा दाखवतो तीच दिशा या कुत्र्याने बॉलला दाखवली आहे. हा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होतोय. देशात IPL फुल्ल रंगात आली आहे. क्रिकेटरचे चौकार आणि षटकारांच्या बरसातीचे व्हिडीओ व्हायरल होत आहे. मात्र या व्हिडीओच्या गर्दीत डॉगीचा व्हिडीओ भाव खाऊन गेला हे नक्की 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x