उगाचच भुंकणाऱ्या कुत्र्यांना घोड्याने घातली अशी लाथ... पुन्हा नादालाच नाय लागला

 Viral video : अनेकदा कुत्र्यांना विनाकारण भुंकण्याची सवय असल्याचे तुमच्या लक्षात आले असेल. माणूस असो वा प्राणी, ते सर्वांवर भुंकत राहतात 

Updated: Mar 30, 2022, 10:02 AM IST
उगाचच भुंकणाऱ्या कुत्र्यांना घोड्याने घातली अशी लाथ... पुन्हा नादालाच नाय लागला title=

मुंबई : Viral video : अनेकदा कुत्र्यांना विनाकारण भुंकण्याची सवय असल्याचे तुमच्या लक्षात आले असेल. माणूस असो वा प्राणी, ते सर्वांवर भुंकत राहतात आणि विशेषत: अनोळखी व्यक्ती दिसली की त्याच्यावर तुटून पडतात. 

तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की काही कुत्री बाईक किंवा कारने जाणाऱ्या लोकांच्या मागे धावतात आणि भुंकत राहतात. सोशल मीडियावर तुम्ही या संबंधित अनेक व्हिडीओ पाहिले असतील. असाच एक व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हालाही हसू येईल.

व्हायरल होत असलेल्या हा व्हिडीओमध्ये कुत्रे आणि घोडा दिसत आहे.  हे कुत्रे शांत उभ्या असलेल्या घोड्यावर उगाचच भुंकत असतात. आणि घोड्याला त्रास देतात. पण नंतर घोड्याने त्यांना असा धडा शिकवला की ते त्यांना आयुष्यभर लक्षात राहील.

 व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की घोड्याला पाहून दोन कुत्रे कसे भुंकत आहेत. त्यांच्या विनाकारण भुंकल्यामुळे घोडा अस्वस्थ झाला तेव्हा त्याने पाठीमागे एक जोरदार लाथ मारली आणि ती लाथ एका कुत्र्याला लागली. एक जोरदार लाथ बसताच कुत्रा बिथरून गप्प बसतो आणि काही सेकंद तो हलतच नाही. मात्र, असे असतानाही दुसरा कुत्रा घोड्यावर भुंकतच राहिला.

हा एक अतिशय मजेदार व्हिडिओ आहे, जो ir_geographic नावाच्या Instagram पेजवर शेअर करण्यात आला आहे. अवघ्या 8 सेकंदांच्या या व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत, तर 3 हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईकही केले आहे.