Suryakumar Yadav: 'थांबाना, पुढचा वर्ल्डकप भारतातच...'; रोहित-विराटच्या निवृत्तीनंतर सूर्याने सांगितला ड्रेसिंग रूममधील माहोल

Suryakumar Yadav: रोहित शर्मा आणि विराट कोहली या स्टार जोडीने टीम इंडियासाठी यापुढे टी-20 हा फॉरमॅट खेळणार नसल्याचं स्पष्ट केलं. चाहत्यांना मात्र हा आश्चर्याचा धक्का होता. 

सुरभि जगदीश | Updated: Jul 1, 2024, 08:40 PM IST
Suryakumar Yadav: 'थांबाना, पुढचा वर्ल्डकप भारतातच...'; रोहित-विराटच्या निवृत्तीनंतर सूर्याने सांगितला ड्रेसिंग रूममधील माहोल title=

Suryakumar Yadav: टीम इंडियाने शनिवारी करोडो लोकांचं स्वप्न सत्यात उतरलं. बार्बाडोसमध्ये टी-20 वर्ल्डकपच्या फायनलमध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला आणि ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. या विजयामुळे रोहित सेनेने 17 वर्षांचा दुष्काळ संपुष्टात आणसा आहे. एकीकडे टीम इंडियाचे चाहते फार खुशीत होते, तर दुसरीकडे रोहित शर्मा आणि विराट कोहलीने निवृत्ती घेतल्याने चाहते काहीसे नाराज होते. दरम्यान यावेळी ड्रेसिंग रूममध्ये नेमकं कसं वातावरण होतं, याचा खुलासा स्टार खेळाडू सूर्यकुमार यादवने केलं आहेत. 

सूर्याने सांगितली ड्रेसिंग रूमची इनसाईड स्टोरी

रोहित शर्मा आणि विराट कोहली या स्टार जोडीने टीम इंडियासाठी यापुढे टी-20 हा फॉरमॅट खेळणार नसल्याचं स्पष्ट केलं. चाहत्यांना मात्र हा आश्चर्याचा धक्का होता. यावेळी सूर्याने सांगितलं की, रोहित आणि विराट यांना या मेगा टूर्नामेंटचं अजून एक एडिशन खेळण्यासाठी प्रचंड मनधरणी करण्यात आली. 

दोघांना निवृत्तीपासून रोखण्याचा प्रयत्न

टीम इंडियाचा स्टार सूर्यकुमार यादव एक वृत्त वाहिनीशी संवाद साधताना सांगितलं की, दोघांनाही निवृत्तीपासून रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र ते मान्य झाले नाहीत. कोहलीला त्याच्या शेवटच्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात मॅन ऑफ द मॅच म्हणून निवडण्यात आलं, तर रोहितने विजयानंतर प्रेस कॉन्फ्रेंसमध्ये निवृत्तीची घोषणा केली. 

निवृत्तीच्या निर्णयाने सर्वजण भावुक

यावेळी सूर्यकुमार यादवने पुढे सांगितले की, टीम इंडिया चॅम्पियन झाल्यानंतर ड्रेसिंग रूममधील अनेक खेळाडू भावुक झाले होते. दोन्ही वरिष्ठ खेळाडूंनीही निवृत्ती जाहीर केल्यावर खेळाडू आणखीन भावनिक झाल्याचं दिसून आलं. त्या दोघांना डगआउट आणि ड्रेसिंग रूममध्ये सांगण्यात येत होतं की, आता थांबा, पुढचा वर्ल्डकप भारतातच आहे.

'अशा क्षणी तुमच्या खेळाला सोडून देणं फार कठीण आहे. एवढ्या मोठ्या प्रसंगी त्यांनी निरोप घेतला हे चांगलं आहे. जेव्हा रोहित आणि विराट ड्रेसिंग रूममध्ये बसले होते, तेव्हा आम्ही त्यांना सांगितलं की, 'काही फरक पडत नाही, अजून दीडच वर्ष आहे, दोन वर्षांनी भारतात वर्ल्ड कप होणार आहे,' पण कदाचित दोघांनीही आपलं मनाशी पक्क केलं होतं. मला वाटते यापेक्षा चांगली संधी असूच शकत नाही, असंही सूर्या म्हणाला.