कमी वेळेत मिळेल दुप्पट पैसा, इकडे करा गुंतवणूक

दुप्पट पैसे मिळवण्यासाठी अनेकवेळा चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक केली जाते.

Shreyas deshpande श्रेयस देशपांडे | Updated: Mar 3, 2018, 11:20 PM IST
कमी वेळेत मिळेल दुप्पट पैसा, इकडे करा गुंतवणूक

मुंबई : दुप्पट पैसे मिळवण्यासाठी अनेकवेळा चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक केली जाते. अशा ठिकाणी पैसे टाकल्यामुळे अनेकवेळा फायदा तर सोडाच पण गुंतवलेली रक्कमही परत मिळत नाही. म्युचुअल फंडमध्ये गुंतवणूक केल्यावर सर्वात जलद पैसे दुप्पट होतात पण इकडे गुंतवणूक करण्याची रिस्क गुंतवणूकदार घेत नाहीत. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याची रिस्कही घेतली जात नाही. अशा वेळी पोस्ट आणि बँकेमध्ये गुंतवणूक करण्याचा पर्यायच निवडला जातो. पोस्ट आणि बँकेमध्ये गुंतवणूक केल्यावरही पैसा दुप्पट होतो.

बँकेत एफडी केल्यावर १२ वर्षात पैसे दुप्पट

बँकेत एफडी केल्यावर १२ वर्षांमध्ये तुमचे पैसे दुप्पट होतात. एसबीआय सध्या ५ ते १० वर्षांच्या एफडीवर ६ टक्के व्याज देत आहे. या व्याजदरानुसार गुंतवणूक केल्यावर १ लाख रुपये १२ वर्षांमध्ये २ लाखांपेक्षा जास्त होतात.

पोस्टामध्ये १० वर्षात दुप्पट होतील पैसे

पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक केली तर १० वर्षांमध्ये पैसे दुप्पट होतात. पोस्टामध्ये सध्या ५ वर्षांच्या टाईम डिपॉझिटसाठी ७.६ टक्के व्याज देण्यात येतं. टाईम डिपॉझिटमध्ये जास्तीत जास्त ५ वर्षापर्यंत गुंतवणूक करता येते. ५ वर्षानंतर पुन्हा टाईम डिपॉझिटमध्ये गुंतवणूक केली तर पैसे दुप्पट होतात. पोस्टामध्ये १ लाख रुपये गुंतवले तर ७.६ टक्क्यांच्या व्याजानं १० वर्षांनी पैसे २ लाख रुपये होतात.

बँक-पोस्टापेक्षा इकडे लवकर दुप्पट होतात पैसे

पोस्ट ऑफिसमध्ये किसान विकास पत्रामध्ये ११५ महिने म्हणजेच ९ वर्ष ७ महिने पैसे दुप्पट होतात. पोस्ट ऑफिस एक हजार, पाच हजार, दहा हजार आणि पन्नास हजारांची किसान विकास पत्र जारी करतं. किसान विकास पत्रामध्ये जास्तीत जास्त गुंतवणुकीची सीमा नाही. गरज पडली तर अडीच वर्षानंतर किसान विकास पत्रातली गुंतवणूक काढताही येऊ शकते.