E-Aadhar प्रमाणे आता डाऊनलोड करुन ठेवा e-Pan कार्ड, कसे ते जाणून घ्या

पॅनकार्ड आता सर्वच ठिकाणी आवश्यक झाले आहे. त्या शिवाय कोणतेही आर्थिक व्यवहार करता येत नाही. पॅनकार्ड हाताळणे प्रत्येक वेळी शक्य नसते. त्यामुळे तुम्ही ई-पॅन कार्ड मोबाईलमध्ये डाऊनलोड करुन ठेवू शकता.

Updated: Feb 8, 2022, 03:07 PM IST
E-Aadhar प्रमाणे आता डाऊनलोड करुन ठेवा e-Pan कार्ड, कसे ते जाणून घ्या title=

मुंबई : पॅनकार्ड हे आता अत्यावश्यक कागदपत्र बनले आहे. आजकाल सरकारी ते खाजगी काम करण्यासाठी पॅन कार्ड अनिवार्य झाले आहे. बँकेत खाते उघडायचे असो, क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड घ्या किंवा आयटीआर फाइल करा, पॅन कार्ड सर्वत्र अनिवार्य आहे. अशा परिस्थितीत तुमचे पॅन कार्ड कुठेतरी हरवले असेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. आता तुम्ही आयकराच्या नवीन वेबसाइटवरून तुमचे ई-पॅन कार्ड सहजपणे डाउनलोड करू शकता. ई-पॅन कार्डची संपूर्ण प्रक्रिया (e-Pan Card Download) जाणून घेऊया.

ई-पॅन कसे डाउनलोड करावे

1. सर्वप्रथम आयकर वेबसाइट https://www.incometax.gov.in/iec/foportal वर लॉग इन करा.
2. आता तुम्ही 'Instant E PAN' वर क्लिक करा.
3. पुढे, 'New E PAN' वर क्लिक करा.
4. आता तुम्ही तुमचा पॅन क्रमांक टाका.
5. तुम्हाला तुमचा पॅन क्रमांक आठवत नसेल, तर तुमचा आधार क्रमांक टाका.
6. येथे अनेक नियम आणि अटी दिल्या आहेत, त्या काळजीपूर्वक वाचा नंतर 'स्वीकारा' वर क्लिक करा.
7. आता तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर OTP येईल, तो लिहा.
8. आता दिलेले तपशील वाचल्यानंतर 'पुष्टी करा'.
10. आता तुमचा पॅन तुमच्या ईमेल आयडीवर PDF फॉरमॅटमध्ये पाठवला जाईल.
11. येथून तुम्ही तुमचा 'ई-पॅन' डाउनलोड करू शकता.

पॅन-आधार लिंक अनिवार्य (Aadhar-Pan Link)

लक्षात ठेवा, जर तुम्हाला तुमचा पॅन क्रमांक आठवत नसेल तर तुम्ही तुमच्या आधार कार्डच्या मदतीने ई-पॅन कार्ड डाउनलोड करू शकता. मात्र यासाठी तुमचे पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक असणे अनिवार्य आहे. जर तुमचा पॅन आणि आधार लिंक नसेल तर तुम्ही ई-पॅन डाउनलोड करू शकणार नाही.