कोरोना जंग : अमोल कोल्हे लोकसभेत कडाडलेत, दाखवला आरसा

Coronavirus News : कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रोनने (Omicron) चिंता वाढवली आहे. असे असताना भारतातही ओमायक्रोनने शिरकाव केला आहे. 

Updated: Dec 3, 2021, 08:00 AM IST
कोरोना जंग : अमोल कोल्हे लोकसभेत कडाडलेत, दाखवला आरसा title=
Dr Amol Kolhe Facebook Page

नवी दिल्ली : Coronavirus News : जगात कोरोनाचे थैमान सुरुच आहे. पहिली, दुसरी, तिसरी लाट आली. आता चौथी लाट आहे. कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रोनने (Omicron) चिंता वाढवली आहे. असे असताना भारतातही या ओमायक्रोनने शिरकाव केला आहे. (Omicron new virus) त्यामुळे चिंतेत अधिक भर पडली आहे. (Corona Crisis) आता कोरोनाविरोधातील लढाई अधिक तीव्र करण्याची गरज आहे, असे लोकसभेत ( Lok Sabha session) राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे ( Dr Amol Kolhe) यांनी म्हटले. त्याचवेळी त्यांनी कोरोना जंगबाबत बोलताना केंद्र सरकारला आरसा दाखवला. (Dr Amol Kolhe on Corona Crisis in Lok Sabha session)

खासदार कोल्हे यांनी काल लोकसभेत भाषण केले. त्यांनी कोरोनाच्या स्थितीबद्दल आणि ओमायक्रोनच्या भीतीबद्दल देशात जे वातावरण तयार झाले आहे, याकडे सभागृहाचे लक्ष वेधले. ही भीती दूर करण्याची गरज आहे. तसेच पुढे काय उपाय-योजना केल्या पाहिजेत तेही  स्पष्ट केले. त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. कोरोनाच्या नवीन व्हेरियंटचा सामना कसा करावा याबद्दल केंद्र सरकारने रणनीती तयार करावी, असे देखील ते म्हणाले.

त्याचबरोबर कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर कमी करता येईल का याचा विचार करावा. तसेच सीरम कंपनीकडे जगभरातून बुस्टर डोसची मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर आपलं धोरण काय आहे? लहान मुलांच्या लसीकरणाची सद्यस्थिती काय आहे, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.

 यावेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे केंद्र सरकारला जोरदार टोला लगावला. जर लसीकरणाच्या सर्टिफिकेटवर फोटो लावायचा असेल तर डेथ सर्टिफिकेटची जबाबदारी देखील घ्या, असे ते म्हणाले. 'मी एकांतवासात जाण्याचा निर्णय घेतला कारण...' माझी जात विचारू नका, मी छत्रपतींचा मावळा, असे अमोल कोल्हे म्हणाले. 

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी आपल्या भाषणात एक कविता सादर केली. त्यावेळी ते म्हणाले. जंग के एक पडाव पर क्षती पहुंची तो क्या हुआ, हम बचेंगे तो और भी लढेंगे. लेकिन कदम मिलाकर चलना होगा. नए जोश से प्रारंभ करना होगा. वरना कहेंगे देशवासी..अगर जीत का सेहरा सिर बंधवाना है तो पराजय का बोझ भी स्वीकार करना होगा. अगर व्हॅक्सिनेशन सर्टिफिकेटपर फोटो छपवानी है, तो डेथ सर्टिफिकेट जिम्मा भी लेना होगा.

भाषणाचा पाहा हा व्हिडिओ :