देशातील सर्वात मोठा ड्रोन रुस्तमची दुसरी चाचणी यशस्वी

समुद्रसपाटीपासून मध्यम उंचीवर उड्डाण करणा-या आणि उत्तम क्षमता असणा-या रुस्तम या मानवरहित ड्रोनची दुसऱी चाचणी यशस्वी झालीये.. डीआरडीओनं या ड्रोनची निर्मिती केलीये... 

Updated: Feb 26, 2018, 11:00 AM IST
देशातील सर्वात मोठा ड्रोन रुस्तमची दुसरी चाचणी यशस्वी title=

नवी दिल्ली : समुद्रसपाटीपासून मध्यम उंचीवर उड्डाण करणा-या आणि उत्तम क्षमता असणा-या रुस्तम या मानवरहित ड्रोनची दुसऱी चाचणी यशस्वी झालीये.. डीआरडीओनं या ड्रोनची निर्मिती केलीये... 

हा ड्रोन एकावेळी 24 तासांपर्यंत उड्डाण करु शकतो. या ड्रोनमुळे शत्रूवर करडी नजर ठेवण्यासोबतच शत्रूवर हल्ला करण्याचीही क्षमता आहे... या ड्रोनचं इंजिन उच्च क्षमतेचं आहे.. चित्रदुर्गावर या ड्रोननं प्रथम यशस्वी उड्डाण केलं.. 

यावेळी डीआरडीओचे अध्यक्ष एस. क्रिस्तोफर, वैमानिक व्यवस्थेचे महासंचालक सी.पी. रामानारयन, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन व्यवस्थेचे महासंचालक जे. मंजुला आणि इतर वरिष्ठ शास्त्रज्ञ उपस्थित होते.