लग्नाच्या सातव्या फेरीलाच नवरीला झाल्या उलट्या, तुम्ही म्हणाल Good New पण......

एका मीडिया अहवालानुसार, मॅट्रिमोनियल साईटवर  (matrimonial site) या नवविवाहीत दांपत्याची भेट झाली होती.

Updated: Jul 4, 2021, 08:26 PM IST
लग्नाच्या सातव्या फेरीलाच नवरीला झाल्या उलट्या, तुम्ही म्हणाल Good New पण...... title=

बंगळूर : कर्नाटकातील बंगळूरमधील घटनेने लग्नात उपस्थित सगळ्याच लोकांना धक्का दिला आहे. येथे एका लग्नात सगळं सुरळीत सुरु असताना लग्न संपन्न झाल्यानंतर नवरीला अचानत उलट्या सुरु झाल्या, त्यानंतर तिला रुग्णालयात नेण्यात आले. बायकोला अचानक होऊ लागलेल्या उलट्यांमुळे नवऱ्याला ती प्रेग्नेंट असल्याचा संशय आला ज्यामुळे त्याने आपल्या बायकोची वर्जीनीटी आणि प्रेग्नेंसी चाचणी करायला डॉक्टरांना सांगितली. परंतु नंतर डॉक्टरांनी नवरीला उल्ट्या होण्याचे खरे कारण सांगितले. तेव्हा मात्र नवऱ्याला बायकोवर आरोप करणे माहागात पडले.

कारण त्या नवरीला गॅस्ट्राइटिस (Gastritis) चा त्रास होता. ज्यामुळे तिला लग्नात उलट्या झाल्या. परंतु नवऱ्याने तिचा विश्वास घात आणि तिच्या संमतीशिवाय तिची चाचणी केली म्हणून बायकोने आपल्या नवऱ्यावरती केस केली आहे. परंतु नवऱ्याने हा आरोप स्वीकारण्यास नकार दिला.

एका मीडिया अहवालानुसार, मॅट्रिमोनियल साईटवर  (matrimonial site) या नवविवाहीत दांपत्याची भेट झाली होती. 29 वर्षीय दिनेश (बदललेलं नाव) आणि 26 वर्षीय मिनल (बदललेलं नाव)  यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघेही MBA ग्रॅज्यूएट आहेत. खूप दिवस एकत्र राहिल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

परंतु लग्नाच्या 15 दिवस आधी मिनलच्या आईचे कर्करोगाने निधन झाले होते. ज्यानंतर मिनल नैराश्यात गेली. त्यामुळे दिनेशला वाटले की, मिनल लग्नात आनंदी नाही. खरेतर नैराश्य काळात मिनल तिच्या एका मित्राशी बोलत असायची. त्याने मिनलला या काळात खुप मदत केली आणि या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी तिला मदत केली. परंतु त्यांच्या मैत्रीचा दिनेशला गैरसमज झाला.

लग्नाच्या दिवशी, जठराला सूज आल्याने मिनलने उलट्या केल्या. त्यानंतर दिनेशने तिला ताबडतोब रुग्णालयात नेले. मिनलला असे वाटले की, दिनेशने उपचारांसाठी तिला रुग्णालयात आणले आहे. परंतु जेव्हा डॉक्टरांनी तिची गर्भधारणेची आणि वर्जिनिटी चाचणी केली तेव्हा तिला आश्चर्य वाटले.

चाचणीनंतर, मिनल दिनेशवर ओरडू लागली. आपल्या बहिणीच्या घरी निघून गेली. तीन महिन्यांनंतर वैवाहिक वाद टाळण्यासाठी दिनेश फॅमिली काउंसिलिंग सेंटरवर पोहोचला आणि पत्नीविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर मिनलवर बचाव समन्स बजावण्यात आला. परंतु मिनलची कथा ऐकून फॅमिली काउंसिलिंग सेंटरमधील लोकांना आश्चर्य वाटले.

फॅमिली काउंसिलर अपर्णा म्हणाल्या- " मिनलने आम्हाला सांगितले की, तिची गर्भधारणेची आणि वर्जिनिटी चाचणी तिला न विचारता करण्यात आली. जेव्हा चाचणी प्रक्रिया पूर्ण झाली. तेव्हा तिला हे सगळं कळले." त्यानंतर दिनेशविरोधात मिनलने पोलिसात संशय घेण्याच्या आणि तिचा छळ केल्याबद्दल तक्रार दाखल केली आणि हे प्रकरण कोर्टात गेले. त्याचवेळी दिनेशने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला.